सध्या कोरोना काळात मनुष्याला निसर्गाबद्दल प्रेम आणि आदर वाटू लागलाय. आधीही बरेच जण निसर्ग प्रेमी होते आणि त्यात हळूहळू का होईना भर पडत होती. आता यात भर पडली आहे दोन युवा गायकांची. निहाल तौरो आणि दानिश मोहम्मद हे दोघे इंडियन आयडॉल च्या सुरु असलेल्या सिझन मधील गायक-स्पर्धक असून त्यांना आधीपासूनच बागकामाची आवड होती. दोघांच्याही मते बागकाम मानसिक आनंद देते व त्याचे सुख फक्त शरीराला नाही तर आत्म्याला देखील मिळत असते.
निसर्गप्रेम आणि बागकाम याबद्दल बोलताना निहाल तौरो सांगतो की, “वृक्षारोपण ही प्रक्रियाच माझ्या मनाला खूप आनंद देते, कारण त्यात माझा तणाव दूर होतो आणि माझी एकाग्रता वाढते. मी मंगलोरचा आहे आणि हा प्रांत खूप हिरवागार आहे. मी निसर्गप्रेमी आहे आणि झाडे लावणे हा माझा छंद आहे. त्यामुळे मी आणि दानिशने ठरवले की, आपल्या आसपास शक्य असेल तिथे झाडे का लावू नयेत?”
दानिशसुद्धा निसर्गप्रेमी आहे आणि तो म्हणाला की, “आमच्या हॉटेलच्या लॉनच्या सभोवती झाडे लावण्याचे मी आणि निहाल ने ठरवले. आम्हा दोघांनाही हिरवळ खुणावत होती. निहालसोबत नवी रोपटी लावणे हा खरोखर आनंददायक अनुभव होता. शिवाय एकत्र काम करण्यात ही मजा आली. आम्ही आता हे काम चालूच ठेवू आणि आसपासचा भाग हिरवागार करून टाकू.”
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल चे स्पर्धक निहाल तौरो आणि दानिश मोहम्मद हे दोघे सध्या बागकामाची आनंद उपभोगत आहेत. स्वतःला निसर्गप्रेमी म्हणवून घेणारे निहाल आणि दानिश यांनी झाडे लावण्याचे, प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचे आणि निसर्गासाठी शक्य ती खटपट करण्याचे मनावर घेतले आहे. या दोन्ही स्पर्धकांना वाटते की, निसर्ग त्यांना मनःशांती मिळवून देतो आपल्या गाण्यावर लक्ष केंद्रित करण्यासही मदत करतो.
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल च्या सिझन १२ मध्ये आगामी वीकेंडच्या भागात मुले विरुद्ध मुली अशी चुरस रंगणार आहे. अन्नू मलिक आणि गीतकार मनोज मुंतशिर परीक्षक म्हणून काम करतील तर आदित्य नारायण सूत्रसंचालनाची धुरा सांभाळेल. मस्ती आणि हास्यविनोदाने भरलेल्या या भागांची मजा काही औरच असेल, प्रत्येकाला सुरेल प्रवास घडवणारा असेल.
‘इंडियन आयडॉल सिझन १२’ हा कार्यक्रम प्रसारित होतो दर शनिवारी आणि रविवारी रात्री सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर.
हेही वाचा - दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या हृदयावर झाली शस्त्रक्रिया!