ETV Bharat / sitara

कोकणातील पारंपरिक गणेशोत्सव ‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेत वेगळ्या अनुभवांसह!

कोकणातील गणेश उत्सव राज्यातील इतर भागापेक्षा सांस्कृतिकदृष्ट्या वेगळा आहे. डोळ्यांना सुखावणारी अनेक दृष्ये या उत्सवात कोकणात पाहायला मिळतात. ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेतही हा नजरा पाहायला मिळणार आहे. गणेश उत्सव काळात प्रसारित होणाऱ्या भागात कोकणच्या उत्सवाचे दर्शन घडणार आहे.

‘रात्रीस खेळ चाले ३’
‘रात्रीस खेळ चाले ३’
author img

By

Published : Sep 13, 2021, 7:40 PM IST

गणपती बाप्पाच्या आगमनाची वेळ जवळ येऊ लागताच मुंबई आणि इतर प्रदेशातील चाकरमानी कोकणाकडे धाव घेताना दिसतात. कोकणच्या पार्श्वभूमीवरील टेलिव्हिजन मालिकांनाही प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसतात. झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘गाव गाता गजाली’ या मालिकांमुळे प्रेक्षकांना कोकणच्या सौंदर्याने अधिक भुरळ घातली आणि हे कोकण ज्यांचा नजरेने टिपलं ते कॅमेरामन गणेश कोकरे. सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत सेट वर हसत खेळत अनेक दृश्य टिपणाऱ्या गणेश कोकरे यांनी कोकणातल्या गणेशोत्सवाचं चित्रीकरण करताना असाच एक आगळा वेगळा प्रयोग केला.

‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेत गणेशोत्सव

कोकणातली परंपरा असणाऱ्या फुगड्या चित्रित करताना छाया चित्रकार गणेश कोकरे ह्यांनी एका हातात कॅमेरा आणि तर दुसऱ्या हाताने कलाकारांसोबत फुगडी घालून चित्रीकरण केलं. ज्यामुळे उत्तम चित्रीकरण झालंच शिवाय एक वेगळा अनुभव, वेगळा आनंद सगळ्यानाच मिळाला आणि हा आनंद प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे ‘रात्रीस खेळ चाले ३’ च्या गणपती विशेष भागात.

इतकंच नव्हे कोकणातील गणेशोत्सव हा आपल्यामध्येच एक वेगळा अनुभव असतो त्यामुळे कोकणात जसा पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा होतो त्याचा अनुभव प्रेक्षक या मालिकेतून अनुभवू शकतात. या विशेष भागांमध्ये प्रेक्षक भजन देखील ऐकू आणि पाहू शकतील.

हे ‘रात्रीस खेळ चाले ३’ मधील गणेशोत्सव विशेष भाग येत्या आठवड्यात प्रसारित होणार आहे.

हेही वाचा - गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारं गाणं 'बाप्पा मोरया'!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.