ETV Bharat / sitara

कर्जतच्या एन डी स्टुडिओमध्ये गणेश आचार्यच्या डान्स परफॉर्मन्सने नववर्षाचं जल्लोषी स्वागत - Ganesh Acharya perform in ND studio

नवीन वर्षाच्या स्वागताला कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये मुंबईकरांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी कोरिओग्राफर गणेश आचार्यने आपला जबरदस्त परफॉर्मन्स दिला. याविषयी आमच्या प्रतिनिधीशी बातचीत केलीय एनडी स्टुडिओचे नितीन देसाई यांनी.

ND studio new year party
एनडी स्टुडिओचे नितीन देसाई
author img

By

Published : Jan 1, 2020, 4:31 PM IST

कर्जतच्या 'एन डी स्टुडिओ' मध्ये सरत्या वर्षाला निरोप देऊन वर्ष 2020च जल्लोषात स्वागत करण्यात आलं. या निमित्ताने संपूर्ण स्टुडिओ अतिशय आकर्षक रोषणाईने सजवण्यात आलेला होता. यंदा प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्या ग्रुपचा डान्स परफॉर्मन्स हे या नववर्ष स्वागत सोहळ्याचं मुख्य आकर्षण होत. तर 'मराठी बिग बॉस' फेम अभिनेत्री हिना पांचाळ हिने देखील येथे खास परफॉर्मन्स दिला.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पानिपत' या सिनेमाच्या सेटचा काही भाग वापरून संपूर्ण स्टेज सजवण्यात आले होते. एकूणच या सोहळ्याचा रागरंग नितीन देसाई यांच्या सेट्स प्रमाणेच भव्यदिव्य होता. देशविदेशातून आलेले अनेक नृत्य कलावंत आणि बेली डान्सर्स यांनीही आपली कला येथे सादर केली. या खास सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी अनेक मुंबईकर आणि पुणेकरांची पावलं एन डी स्टुडिओकडे वळली..

एनडी स्टुडिओचे नितीन देसाई

याशिवाय स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना संधी देण्यासाठी आयपीएलच्या धर्तीवर 'डीपीएल' म्हणजेच डान्स प्रीमिअर लीगचे येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक स्थानिक तरुण-तरुणींनी भाग घेतला. त्याशिवाय यंदा प्रथमच 'मिस्टर अँड मिसेस एन डी स्टुडिओ' अशी सौंदर्यस्पर्धा इथे घेण्यात आली.

रात्री 12 वाजता फटाके फोडून वर्ष 2020चं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यासोबतच आगामी वर्षात देखील उत्तमोत्तम कार्यक्रम करून 'एन डी स्टुडिओ'चा नावलौकिक अजून वाढवण्याचा संकल्प देखील नितीन चंद्रकांत देसाई यांनी केला आहे..याबाबत त्यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी विराज मुळे यांनी..

Intro:कर्जतच्या 'एन डी स्टुडिओ' मध्ये सरत्या वर्षाला निरोप देऊन वर्ष 2020च जल्लोषात स्वागत करण्यात आलं. या निमित्ताने संपूर्ण स्टुडिओ अतिशय आकर्षक रोषणाईने सजवण्यात आलेला होता. यंदा प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्या ग्रुपचा डान्स परफॉर्मन्स हे या नववर्ष स्वागत सोहळ्याचं मुख्य आकर्षण होत. तर 'मराठी बिग बॉस' फेम अभिनेत्री हिना पांचाळ हिने देखील इथे खास परफॉर्मन्स दिला.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पानिपत' या सिनेमाच्या सेटचा काही भाग वापरून संपूर्ण स्टेज सजवण्यात आले होते. एकूणच या सोहळ्याचा रागरंग नितीन देसाई यांच्या सेट्स प्रमाणेच भव्यदिव्य होता. देशाप्रदेशातून आलेले अनेक नृत्य कलावन्त आणि बेली डान्सर्स यांनीही आपली कला इथे सादर केली. या खास सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी अनेक मुंबईकर आणि पुणेकरांची पावलं एन डी स्टुडिओ कडे वळली..

याशिवाय स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना संधी देण्यासाठी आयपीएलच्या धर्तीवर 'डीपीएल' म्हणजेच डान्स प्रीमिअर लीगचे इथे आयोजन करण्यात आले होते. अनेक स्थानिक तरुण तरुणींनी भाग घेतला. त्याशिवाय यंदा प्रथमच 'मिस्टर अँड मिस एन डी स्टुडिओ' अशी सौंदर्यस्पर्धा इथे घेण्यात आली.

रात्री 12 वाजता फटाके फोडून वर्ष 2020चं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यासोबतच आगामी वर्षात देखील उत्तमोत्तम कार्यक्रम करून 'एन डी स्टुडिओ'चा नावलौकिक अजून वाढवण्याचा संकल्प देखील नितीन चंद्रकांत देसाई यांनी केला आहे..याबाबत त्यांच्याशी बातचित केली आहे आमचा प्रतिनिधी विराज मुळे याने..

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.