मुंबई - 'ब्रीद: इन टू दी शॅडोज' या मालिकेतील अभिषेक बच्चनच्या पहिला लूक रिलीज केलेला आहे. ज्यात तो एका हरवलेल्या मुलाच्या पोस्टरकडे एक गहन दृष्टीक्षेप टाकताना दिसतो आहे. आपल्या या फर्स्ट लुकविषयी बोलताना, अभिनेता अभिषेक बच्चन म्हणाला की, “अमेझॉन ओरिजिनल 'ब्रीद: इन टू द शॅडोज'सोबत डिजिटल ऑन-स्क्रीन डेब्यूसाठी मी सज्ज आहे. मागच्या शुक्रवारी जेव्हा या शोच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख घोषित झाली तेव्हापासून तर मी अधिकच उत्साहित झालो आहे. कारण तेव्हापासून मला प्रेक्षकांचे प्रेम आणि जो पाठींबा मिळतो आहे, त्यामुळे नव्या दर्शकांसोबत जोडले जाण्याचा विश्वास दृढ होत आहे. माझी पहिलीच डिजिटल सिरीज रिलीज होत असल्याने मी सध्या आनंदात आहे. हे एक वेगळं माध्यम आहे, ज्यात आपण आपल्या सुविधेनुसार कार्यक्रम पाहू शकतो. या नवीन माध्यमात मला कसा प्रतिसाद मिळतो, तो पाहण्यासाठी मी कमालीचा उत्सुक आहे. येत्या दिवसांमध्ये आम्ही जगासमोर हळू हळू ब्रीद: इन टू द शॅडोजचे रहस्य उलगडणार आहोत."
-
Come back Siya. #BreatheIntoTheShadows @PrimeVideoIN @BreatheAmazon @MenenNithya @TheAmitSadh @SaiyamiKher @mayankvsharma @vikramix @Abundantia_Ent pic.twitter.com/7aDuODAkm3
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) June 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Come back Siya. #BreatheIntoTheShadows @PrimeVideoIN @BreatheAmazon @MenenNithya @TheAmitSadh @SaiyamiKher @mayankvsharma @vikramix @Abundantia_Ent pic.twitter.com/7aDuODAkm3
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) June 18, 2020Come back Siya. #BreatheIntoTheShadows @PrimeVideoIN @BreatheAmazon @MenenNithya @TheAmitSadh @SaiyamiKher @mayankvsharma @vikramix @Abundantia_Ent pic.twitter.com/7aDuODAkm3
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) June 18, 2020
अमेझॉन प्राईम व्हिडिओची ऑरिजिनल सिरीज 'ब्रीद' चा बहुप्रतिक्षित नवीन सीजन 10 जुलै 2020 ला प्रदर्शित होणार आहे. सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर 'ब्रीद: इन द शॅडोज' अबुंदंतिया एंटरटेनमेंट द्वारे रचित आणि निर्मित असून मयंक शर्मा याने या सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. भवानी अय्यर, विक्रम तुली, अरशद सैयद आणि मयंक शर्मा यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने ही सिरीज लिहिली आहे.
या सीरीजद्वारे बॉलीवूड सुपरस्टार अभिषेक बच्चन आपला डिजिटल डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला असून अभिनेता अमित साध पुन्हा एकदा सीनियर इंस्पेक्टर कबीर सावंतच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिरीजमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री निथ्या मेनन देखील आपला डिजिटल डेब्यू करणार असून सैयामी खेरदेखील एका महत्वाच्या व्यक्तिरेखेत दिसेल. ही बहुप्रतीक्षित अमेझॉन ओरिजिनल सीरीज जगभरातील 200 हून अधिक देश आणि प्रदेशात विशेष करून अमेझॉन प्राईम व्हिडिओवर लॉन्च होणार आहे.