मुंबई - साजिद - वाजिद ही संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध जोडी आहे. मात्र, नुकतंच वाजिद खान यांचं मुंबईतील एका रुग्णालयात निधन झालं. आपल्या संगीतानं लाखोंच्या मनावर राज करणाऱ्या वाजिद खान यांनी गाणी संगीतबद्ध करण्यासोबतच अनेक गाण्यांना आवाजही दिला आहे. हटा सावन की घटा, ईद मुबारक आणि ले ले मजा ले अशी वाजिद यांच्या आवाजातील अनेक गाणी हीट ठरली आहेत.
वाजिद यांनी आता या जगाचा निरोप घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ऐकूया त्यांची काही अविस्मरणीय गाणी