ETV Bharat / sitara

‘अजूनही बरसात आहे' च्या चाहतीने काढली पोस्टरची रांगोळी! - 'अजूनही बरसात आहे' मालिका सोनी मराठीवर

रश्मी विसपुते नावाच्या एका चाहतीने स्वतःच्या घरात 'अजूनही बरसात आहे' या मालिकेची चक्क रांगोळी काढली आहे. रश्मी ही नाशिकची असून मुक्ता आणि उमेश या दोघांची मोठी चाहती आहे. या रांगोळीला सोशल मीडियावर चांगली प्रसिद्धी मिळते आहे.

-ajunhi-barsat-aahe
‘अजूनही बरसात आहे'
author img

By

Published : Jul 16, 2021, 8:28 PM IST

'अजूनही बरसात आहे' मालिका १२ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मुक्ता आणि उमेश यांची जोडी तब्बल ८ वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे आणि त्यांना ती भावते सुद्धा आहे. मालिकेच्या नावावरून आणि जाहिरात पाहून याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती आणि आता मालिका सुरु झाल्यावर ती त्यांच्या अपेक्षेवर खरी उतरताना दिसतेय. थोडी खुसखुशीत आणि अनेक रंगांनी भरलेली मीरा आणि आदी यांची ही प्रेमकथा प्रेक्षकांना आवडतेय.

मालिकेच्या आजपर्यंतच्या सगळ्या प्रोमोंना, पोस्टर्सना लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. ‘अजूनही बरसात आहे' मालिकेतील मीरा आणि आदिराज यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. प्रेक्षकांच्या या आवडत्या जोडीसाठी तुफान प्रतिसाद मिळतो आहे. मालिकेचा पहिला लूक प्रेक्षकांसमोर आला आणि प्रेक्षकांच्या मनात मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली होती.

ajunhi-barsat-aahe-
‘अजूनही बरसात आहे' पोस्टरची रांगोळी!

याशिवाय रश्मी विसपुते नावाच्या एका चाहतीने स्वतःच्या घरात 'अजूनही बरसात आहे' या मालिकेची चक्क रांगोळी काढली आहे. रश्मी ही नाशिकची असून मुक्ता आणि उमेश या दोघांची मोठी चाहती आहे. या रांगोळीला सोशल मीडियावर चांगली प्रसिद्धी मिळते आहे. मुक्ता आणि उमेश यांनीही रश्मीने काढलेली रांगोळी शेअर करून तिचे आभार व्यक्त केले आहेत. आता मालिकेत पुढे काय घडेल याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

ajunhi-barsat-aahe-
‘अजूनही बरसात आहे' पोस्टरची रांगोळी!

रोहिणी निनावे आणि मुग्धा गोडबोले यांनी मालिकेची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत तर केदार वैद्य मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत. या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी आवाज दिला असून अशोक पत्की यांनी मालिकेचे शीर्षकगीत संगीतबद्ध केले आहे. मालिकेमध्ये राजन भिसे, उमा सरदेशपांडे, समिधा गुरू, सूचिता थत्ते, पल्लवी वैद्य, सचिन देशपांडे अशी कलाकार मंडळीही असणार आहेत.

'अजूनही बरसात आहे' ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.