मुंबई - ‘सनफ्लॉवर’ या आगामी वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता रणवीर शौरी म्हणाला, की सुनील ग्रोव्हरबरोबर काम करणे हा एक रोमांचक अनुभव आहे.
रणवीर म्हणाला, "जेव्हा मला 'सनफ्लॉवर' ची कथा मिळाली तेव्हा मी विचारले की सोनूची व्यक्तिरेखा कोण साकारणार आहे, आणि मला सांगण्यात आले की सुनील ग्रोव्हर ही भूमिका साकारत आहे. तेव्हापासून मी या कथेचा एक भाग बनण्यासाठी खूप उत्साही होतो.''
रणवीरने सांगितले की, “ही मालिका एक मर्डर मिस्ट्री आहे आणि सुनीलबरोबर काम केल्याने मला फार आनंद झाला आहे. तो खरोखर एक प्रतिभावान अभिनेता आहे आणि त्याला सर्व योग्य संधी मिळत आहेत. त्याने कॉमेडीतून सुरुवात केली आहे, म्हणून त्याचा प्रवास पूर्णतः वेगळा आहे. पण प्रत्यक्षात सुनील खूप चांगला अभिनेता आहे. ''
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
या शोची कथा सनफ्लॉवर नावाच्या एका गृहनिर्माण सोसायटीत घडलेला खून आणि त्यानंतरच्या चौकशीभोवती फिरते.
या शोमध्ये रणवीर एका पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारत आहे. यात सुनील ग्रोव्हर हा या सोसायटीतील रहिवाशांपैकी एक सोनू ही व्यक्तीरेखा साकारत आहे. रणवीर यापूर्वी 'रंगबाज' आणि 'लूटकेस' चित्रपटात खाकी वर्दीत दिसला होता.
विकास बहल दिग्दर्शित या वेब सीरिजमध्ये रणवीर शौरी आणि सुनील ग्रोव्हरसह मुकुल चड्ढा, गिरीश कुलकर्णी, अन्नपूर्णा सोनी, दयाना एरप्पा, आशिष विद्यार्थी आणि शोनाली नागरानी सारखे कलाकार आहेत. ही मालिका 11 जून रोजी झी 5 वर रिलीज होत आहे.
हेही वाचा - प्रतीक बब्बरची बॉलिवूडमध्ये १३ वर्षे, म्हणाला, 'रोलरकोस्टर राइड' सारखा प्रवास