ETV Bharat / sitara

निखळ मनोरंजनाचा कार्यक्रम ‘बँड बाजा वरात’ प्रेक्षकांच्या भेटीला

author img

By

Published : Mar 4, 2022, 9:53 AM IST

विनोदी बाज असलेले कार्यक्रम टेलिव्हिजनवर सादर होत असतात. इतर मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होताच असते परंतु विनोदी कार्यक्रमांतून प्रेक्षकांचा मानसिक शीण निघून जातो. त्याच अनुषंगाने निखळ मनोरंजन करणारा कार्यक्रम ‘बँड बाजा वरात’ सुरू होत आहे.

बँड बाजा वरात

बँड बाजा वरात या झी मराठीवरील आगामी कार्यक्रमाबद्दल प्रेक्षकांना सुरुवाती पासूनच खूप उत्सुकता होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कोण, हा कार्यक्रम कधी भेटीला येणार, हे आणि असे बरेच प्रश्न प्रेक्षकांच्या मनात होते आणि वाहिनीने नुकतंच एका नवीन प्रोमो सोबत या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेता पुष्कराज चिरपुटकर सांभाळणार आहेत. या कार्यक्रमातून लग्नघरातील नववधू-वरांना झी मराठीकडून भरगोस आहेर मिळणार आहे. नुकतंच वाहिनीवर रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये रेणुका शहाणे झी मराठीकडून जबरदस्त आहेर लग्नघरात सप्रेम भेट म्हणून घेऊन जाताना दिसत आहेत. त्यामुळे आता हा कार्यक्रम लग्नघरातील धूम अनुभवण्यासाठी सज्ज झाला आहे तेव्हा प्रेक्षकसुद्धा मनोरंजनाच्या भरगोस आहेरासाठी तयार असतील यात शंकाच नाही.‘बँड बाजा वरात’ हा कार्यक्रम १८ मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हेही वाचा - रिंकू राजगुरूचा 'झुंड'मधील लूक आणि पारंपरिक साडीतील सुंदर फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.