मुंबई - निर्माती एकता कपूर 'द मॅरेड वूमन' ही नवीन वेब सीरिज प्रदर्शित करण्यासाठी तयार आहे आणि तिचे म्हणणे आहे की ती डिजिटल प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारची नाट्यमय कलाकृती दाखवण्यासाठी प्रतीक्षा करीत होती. कारण अशा आशयाला टीव्ही मालिका अथवा चित्रपटातून न्याय देता आला नसता.
'द मॅरेड वूमन' ही मालिका मंजू कपूरच्या त्याच नावाच्या पुस्तकावर आधारित असून रिधी डोगरा आणि मोनिका डोगरा मुख्य भूमिकेत आहेत.
पुस्तकाच्या आधारे तिने शो बनवण्याचा निर्णय का घेतला, असे विचारले असता एकता म्हणाली, "मी पुस्तक वाचले आणि मला ते आवडले, म्हणून मला त्यातून एक शो तयार करायचा होता. जेव्हा मी मंजू (कपूर) जी यांना भेटले, तेव्हा मला वाटले की ते एक उत्तम पुस्तक आहे, परंतु टीव्ही मालिका किंवा चित्रपट हे माध्यम योग्य वाटत नव्हते. त्यामुळे मी अशा माध्यमाची वाट पाहिली. डिजिटल माध्यम त्यासाठी परिपूर्ण व्यासपीठ आहे असे मला वाटले.''
शोचा ट्रेलरमध्ये अस्था (रिधी डोगरा) आणि पीपलिका (मोनिका डोगरा) च्या व्यक्तिरेखा दिसतात. नव्वदच्या दशकात तयार केलेली ही कथा अस्थांभोवती फिरणारी आहे.
'मॅरेड वूमन'मध्ये इमाद शाह, आयशा रझा, राहुल वोहरा, दिव्या सेठ शहा, नादिरा बब्बर आणि सुहास आहुजा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा शो आल्ट बालाजी आणि झी ५ वर ८ मार्चपासून स्ट्रिमिंग होणार आहे.
हेही वाचा - अभिनेता संदीप नाहरने केली आत्महत्या; मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडिओ