ETV Bharat / sitara

ईटीव्ही भारत विशेष : हरवत चाललेली 'ती' दिपावली..

वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून आपण सर्वजण दिपावलीकडे पाहतो. आपला हा धार्मिक उत्सव आहे. प्रकाशाचा हा उत्सव आपल्याला आनंद देणारा उत्सव आहे. याच्यामागे हाजारो वर्षांची परंपरा आहे हे आपण विसरूनच गेल्याचं हल्ली जाणवत आहे. कालानुरूप दिपावली साजरी करण्याच्या पद्धती आणि त्याचे स्वरूप बदलत चालले आहे. त्यामुळे खरंच पूर्वीची 'ती' दिपावली हरवत चालली आहे का ? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. पाहुयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा यावरचाच हा विशेष रिपोर्ट...

हरवत चाललेली 'ती' दीपावली..
हरवत चाललेली 'ती' दीपावली..
author img

By

Published : Nov 2, 2021, 5:34 PM IST

Updated : Nov 3, 2021, 2:55 PM IST

कोल्हापूर - वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून आपण सर्वजण दिपावलीकडे पाहतो. आपला हा धार्मिक उत्सव आहे. प्रकाशाचा हा उत्सव आपल्याला आनंद देणारा उत्सव आहे. याच्यामागे हाजारो वर्षांची परंपरा आहे हे आपण विसरूनच गेल्याचं हल्ली जाणवत आहे. कालानुरूप दिपावली साजरी करण्याच्या पद्धती आणि त्याचे स्वरूप बदलत चालले आहे. त्यामुळे खरंच पूर्वीची 'ती' दिपावली हरवत चालली आहे का ? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. पाहुयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा यावरचाच हा विशेष रिपोर्ट...

चंद्रकांत जोशी, अध्यक्ष, कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी

दिवाळी म्हंटले की, उठण्याने अंघोळ, फटाके, नवे कपडे, फराळ, रांगोळी आणि बरंच काही :

परंपरा या परिवर्तनशील आहेत. काळाबरोबर त्या बदललेल्या आहेत. असे असले तरी भावना त्याच असतात. मात्र या बदलत्या डिजिटल युगात त्यातील अप्रुप सुद्धा निघून गेले आहे. पूर्वी दिवाळी म्हंटले की, सर्वांना याची उत्सुकता असायची. लहान मुलांना तर याचे विशेष आकर्षण, कारण वर्षातून एकदाच दिवाळीला नवीन कपडे आणि फटाके मिळायचे. दिवाळीला पहाटे 5 वाजता उठून कडाक्याच्या थंडीत चुलीवरील गरम पाण्याने अंघोळ. विशेष म्हणजे सुवासिक तेल आणि सुगंधी उठण्याने घातलेली ही अंघोळ नेहमीच लक्षात राहण्यासारखी असायची. घरातील महिला दिवाळीच्या आदल्या दिवशीच अंगण शेणाने सारवून चकाचक करायच्या. दिवाळी दिवशी या अंगणात ठिपक्यांची आकर्षक रांगोळी काढली जायची. रांगोळी काढून झाल्यावर लगेचच लहान मुलांना त्यासाठी हा सण सर्वाधिक आवडतो त्या फटाक्या वाजायला सुरुवात व्हायची. या सर्वांमध्ये एक गोडवा आणि त्याचबरोबर परंपरा सुद्धा पूर्वी लोकं जपत होती. आजही अनेकजण या रूढी परंपरानुसार दीपावली साजरी करतात. मात्र त्यातील उत्साह आणि ती मजा आता राहिली नाहीये. धावपळीच्या युगात केवळ सण म्हणून आणि लोकं दिवाळी साजरी करतायेत म्हणून आपणही केली पाहिजे असे अनेकांच्या घरी पाहायला मिळत आहे.

आठवडाभर आधी फराळ करण्यात गुंतलेले हात आता दिसत नाहीत :

पूर्वी दिपावलीच्या आधी एक दोन आठवडे आधीपासूनच फराळ करण्यासाठी घरातील महिलांचे हात गुंतलेले पाहायला मिळायचे. आजही काही ठीकाणी हे पाहायला मिळत आहे. मात्र बदलत्या काळानुसार अनेकजण तयार फराळाकडे जास्त वळले आहेत. पूर्वी गल्लीतील सर्व महिला मिळून एकमेकींच्या घरातील फराळ बनवायचे. त्यामध्ये एक वेगळी मजा असायची. आता मात्र ती मजा पूर्णपणे हरवत चालली असून शहरात तर पाहायला सुद्धा मिळत नाहीये. विशेष म्हणजे आपण केलेले दीपावलीचे गोडधोड पदार्थ नातेवाईकांना द्यायला जाणे त्यांच्याकडूनही ते प्रेमाने येणे हे आता राहिले नसून त्यांनी दिवाळीचा फराळ पाठवला आहे आता आपणही पाठवला पाहिजे. नाही पाठवला तर ते काय म्हणतील ? अशा पद्धतीची व्यवहारिकता सद्या आली असून तो आपलेपणा हरवला आहे.

आता तर रोजच दिवाळी; दिवाळी सण फक्त इव्हेंटच उरला :

दिवाळीला जो उत्साह असायचा तो राहिला नाही कारण आता रोजच दिवाळी सुरू आहे. नवीन कपड्यांचे तर काहीच अप्रूप उरलेले नाही. आता दर महिन्याला आणि आवडेल तिथे नवीन कपडे खरेदी केले जातात. अनेकजण तर मोबाईल वरूनच आवडलेले कपडे ऑर्डर करतात. अनेकांच्या घरात दररोज गोडधोड बनवले जाते. पूर्वी आर्थिक सुबत्ता नसायची आता तसे नाही. अनेकांकडे पूर्वीच्या तुलनेत काही प्रमाणात का होईना पैसे आहेत. त्यामुळे दररोजच दिवाळी साजरी होताना दिसते. म्हणजेच हा केवळ इव्हेंट बनला असल्याची प्रतिक्रिया कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

दिवाळीला पर्यटन नवीन ट्रेंड :

दिवाळी हा सण पूर्वी सर्व कुटुंबीय मिळून एकत्र साजरा करायचे. एकमेकांच्या पाहुण्यांकडे गोड-धोड पदार्थ घेऊन जायचे. आपल्या लोकांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा द्यायचे. भेटायला जायला शक्य नाही झाले तर नातेवाईक एकमेकांना पत्र पाठवायची. मात्र, व्हाट्सअपच्या जमान्यात ती पत्रं सुद्धा हरवली आहेत. पूर्वी अगदी उत्साहात सर्वजण दीपावलीचा आनंद घ्यायचे. मात्र, तो उत्साह, ते प्रेम, ती आपुलकी, आपलेपणा आता उरलेला नसल्याची प्रतिक्रिया ही जोशी यांनी व्यक्त केली. आता दिवाळी आली की, सुट्टीचे चार दिवस कुठेतरी पर्यटनाला जायचे, मोठ्या हॉटेलमध्ये राहायचे, हजार रुपये उधळून पुन्हा परत यायचे हा जणू एक ट्रेंडच बनला असल्याचेही त्यांनी म्हटले. त्यामुळे सणाचा आनंद केंव्हाच निघून गेला असून माणसांमधील संवेदनाच नष्ट झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा - Diwali 2021 : दिवाळी साजरी करण्यामागे काय आहेत पौराणिक कथा? जाणून घ्या....

Last Updated : Nov 3, 2021, 2:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.