ETV Bharat / sitara

‘मलंग’ चित्रपटामूळे वाढली आदित्य रॉय कपूरसह दिशा पटानीची लोकप्रियता - दिशा पटानीची लोकप्रियता

बॉलीवूडचा नवा अ‍ॅक्‍शन हिरो आदित्य रॉय कपूर आणि बॉलीवूडची सध्याची सर्वाधिक सेक्सी अ‍ॅक्टरेस दिशा पटानीची ‘मलंग’ केमिस्ट्री यंगस्टर्सना खूप पसंत पडलीय. ज्यामूळे त्यांच्या लोकप्रियतेत खूप फरक पडलेला दिसून येतोय. दोघांची वाढती लोकप्रियता पाहता, स्कोर ट्रेंड्स इंडिया न्यूजप्रिंट लीडरशीपमध्ये आदित्य आणि दिशाच्या रँकिंगमध्ये खूप फरक पडलेला आहे.

Disha Patani help Malang popularity
रॉय कपूर आणि दिशा पटानी
author img

By

Published : Feb 24, 2020, 4:51 PM IST

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. ह्या आकडेवारीनूसार, मलंगचा प्रोमो येण्याअगोदर, आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानीची रैंकिंग अनुक्रमे, 21 (23 जनवरी) आणि 15 (23 जनवरी) अशी होती. फिल्मचे फस्ट पोस्टर आणि प्रोमो आल्यानंतर एका आठवड्यातच या दोघांच्या धमाकेदार केमिस्ट्रीविषयीच्या चर्चा रंगल्या. खास करून, युवा वर्गात ह्यांची लोकप्रियता एवढी वाढली की, दोघंही लोकप्रियतेची शिखरं पादाक्रांत करत गेले. आदित्य 21वरून 11 व्या क्रमांकावर पोहोचला तर दिशा 15 व्या क्रमांकावरून 5 व्या स्थानी (30 जनवरी) पोहोचली.

चित्रपटाच्या रिलीजवेळी आणि रिलीजच्यानंतर आदित्य आणि दिशा दोघांविषयी देशभरातल्या सर्व न्यूज मीडियामध्ये बातम्या झळकल्या. 13 फेब्रुवारीपर्यंतच्या आकडेवारीनूसार, आदित्य 11व्या स्थानावरून पाचव्या स्थानी तर दिशा पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचलीय.

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, "आदित्य आणि दिशा युवा वर्गात खूप लोकप्रिय आहेत. मलंग सिनेमामूळे तर दोघांच्याही लोकप्रियतेत चांगलाच फरक पडलेला दिसून आला. दोघांचीही सुडौल शरीरयष्टी युवावर्गाच्या आकर्षणाचे केंद्र आहे. युवाई त्यांचे अनुकरण करतानाही दिसतेय. तसेच मलंग सिनेमावेळी आदित्य-दिशाविषयीची अनेक आर्टिकल्स वृत्तपत्रात छापून आली. त्यामूळेही ह्या दोघांच्या लोकप्रियतेत वाढ झाली. “

अश्वनी कौल पूढे सांगतात , "आम्ही मीडिया विश्लेषणासाठी 14 भाषांमध्ये 600 पेक्षा जास्त बातम्यांमधून डेटा संग्रहित करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, प्रिंट प्रकाशन, सोशल मीडिया, व्हायरल न्यूज, प्रकाशने आणि डिजिटल प्लेटफॉर्म समाविष्ट आहेत. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.