ETV Bharat / sitara

डिस्कव्हरी इंडिया, युएन इंडिया आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाचे पर्यावरणपूरक अभियान #StopTheMelt! - डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाचे पर्यावरणपूरक अभियान

डिस्कव्हरी चॅनेलने युएन इंडिया आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियासोबतच्या भागीदारीमध्ये #StopTheMelt ह्या पर्यावरणपूरक अभियानाच्या शुभारंभाची घोषणा केली आहे. ह्या वर्षीच्या युएन जागतिक पर्यावरण दिनाचा परिदृश्य विषय पर्यावरणीय व्यवस्थेचे पुनरुज्जीवन हा आहे अणि त्यासंदर्भात डिस्कव्हरी इंडियाचे उद्दिष्ट पृथ्वीच्या दयनीय स्थितीवर प्रकाश टाकणे, हे आहे.

#StopTheMelt!
#StopTheMelt!
author img

By

Published : Jun 5, 2021, 9:10 PM IST

जागतिक तापमानवाढीचे गंभीर परिणाम दर्शवणा-या आणि सर्व व्यक्तींन धोक्याचा इशारा देणारे प्रश्न विचारणा-या डिस्कव्हरी नेटवर्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रोचक क्रिएटिव्हजचे अभियान #StopTheMelt ला पाठबळ मिळाले आहे. समाजातील प्रभावशाली व्यक्तिमत्वे जसे मनोज बाजपेयी, दिया मिर्झा, प्रतिक गांधी, नीरज पांडे (चित्रपट निर्माते), सानिया मिर्झा आणि पर्यावरण विशेषज्ञ इव्हान कार्टर, निजेल मार्वन व इतर अनेक जण पर्यावरणाला वाचवण्याच्या व आपल्या सवयींबद्दल नव्याने विचारमंथन करणा-या ह्या उद्दिष्टामध्ये सहभाग देण्यासाठी पुढे आले आहेत.

डिस्कव्हरी चॅनेलने युएन इंडिया आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियासोबतच्या भागीदारीमध्ये #StopTheMelt ह्या पर्यावरणपूरक अभियानाच्या शुभारंभाची घोषणा केली आहे. ह्या वर्षीच्या युएन जागतिक पर्यावरण दिनाचा परिदृश्य विषय पर्यावरणीय व्यवस्थेचे पुनरुज्जीवन हा आहे अणि त्यासंदर्भात डिस्कव्हरी इंडियाचे उद्दिष्ट पृथ्वीच्या दयनीय स्थितीवर प्रकाश टाकणे, हे आहे. इतकी मोठी समस्या ही फक्त नाट्यमय कृतीद्वारेच अधोरेखित करता येऊ शकते आणि म्हणून ह्या जागतिक पर्यावरण दिवशी, पहिल्यांदाच डिस्कव्हरी इंडिया आपल्या लोगोमध्ये बदल करून जागतिक तापमानवाढीच्या परिणामांच्या आकलनाला चालना देणार आहे.

या अभियानाबद्दल बोलताना, साउथ- एशिया डिस्कव्हरी इन्कच्या मॅनेजिंग डायरेक्टर मेघा टाटा, ह्यांनी सांगितले की, “पर्यवरणावर होणा-या मानवी परिणामाला कमी करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता वाढवण्याची आमची कटिबद्धता आम्ही पुढे नेत आहोत. युएन इंडीया आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया ह्या दोन अतिशय सशक्त व पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सातत्याने कार्यरत असलेल्या दलांसोबत पार्टनरशिप करताना आम्हांला आनंद होत आहे. रिअल लाईफ मनोरंजन क्षेत्रातील नेतृत्व म्हणून नेहमीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुद्द्यांकडे लक्ष आकर्षित करणे आणि अधिक चांगल्या भविष्याच्या दिशेने कार्यरत राहणे, ही आमचीसुद्धा जवाबदारी आहे.”

आपले विचार मांडताना डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी व सीईओ रवी सिंह यांनी सांगितले की, “डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडीयाने निसर्गाच्या संवर्धनाचे व लोकांच्या व आपल्या पृथ्वीच्या आरोग्याला पहिले स्थान देऊन सुरक्षित भविष्याचे संदेश देणा-या डिस्कव्हरी इंडियाच्या अभियानांमध्ये नेहमीच आनंदाने सहभाग घेतला आहे. आत्ताच एकत्र येऊन काम करून आपण वातावरण बदल व निसर्गाचा -हास ह्या दुहेरी धोक्याला टाळू शकतो. ह्या वर्षी जागतिक पर्यावरण दिवशी आपल्या पर्यावरणीय व्यवस्थांचे संवर्धन, संरक्षण व पुनरुज्जीवन, ह्यावर आपल्या प्रयत्नांचा भर राहणार आहे व शाश्वत भविष्यासाठीचा तो मार्ग आहे.”

“२०२० हे समस्येच्या आघाताचे वर्ष होते- जागतिक महामारीने जगाच्या सर्व भागांमध्ये हा:हाकार उडवून दिला आणि पर्यावरणाचे संकट तर सतत गंभीर होत जाते आहे. ह्या वर्षी, आपण पर्यावरणीय पुनरुज्जीवनाच्या युएन दशकामध्ये प्रवेश केला असताना अधिक जास्त वृक्षारोपण, आपल्या आहारामध्ये सुधारणा, प्लास्टीकला बंदी आणि त्याचा पुनर्वापर, कमी वापर व रिसायकलिंग अशा सामुहिक कृतीद्वारे आपण वातावरण बदलाप्रती आपल्या कटिबद्धतेला सातत्याने पुढे नेत राहणे अनिवार्य आहे.” असे रेनाटा डेसालियन, युएन रेसिडंट को- ऑर्डिनेटर, भारत ह्यांनी म्हंटले.

हेही वाचा - सोनू सूदच्या घराबाहेर कोविडमुळे रंजल्या गांजलेल्यांची रीघ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.