ETV Bharat / sitara

VIRAL VIDEO: सहदेवचे 'बचपन का प्यार' गाणे गाताना रानू मंडल, तुम्ही पाहिले?

author img

By

Published : Aug 14, 2021, 6:46 PM IST

रानू मंडलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात ती 'बचपन का प्यार' गाताना दिसत आहे.

सहदेवचे 'बचपन का प्यार' गाणे गाताना रानू मंडल

मुंबई - सहदेव दिरदो आणि बादशाह यांचे 'बचपन का प्यार' हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हे गाणे यूट्यूबवर ट्रेंड करत असताना, दुसरीकडे, इन्स्टावरही त्यावर अनेक रील बनवल्या जात आहेत. अलीकडेच, रानू मंडलचा एक व्हिडिओही समोर आला आहे, यात ती 'बचपन का प्यार' गाताना दिसत आहे.

खरं तर सेक्रेड अड्डा नावाच्या इन्स्टा अकाऊंवर एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कॉलर माईक धरून आणि रानू मंडलसोबत उभा असलेला दिसतोय. यात ती 'बचपन का प्यार' गाताना दिसत आहे. ही क्लिप बरीच छोटी आहे, पण वाढत्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मूळ व्हिडिओमध्ये शाळेचा गणवेश घातलेला एक मुलगा शिक्षकांसमोर 'बचपन का प्यार भुल नहीं जाना रे' गाताना दिसतो. या मुलाचे नाव सहदेव आहे, जो छत्तीसगडच्या सुकमाच्या छिंदगड ब्लॉकमध्ये राहतो. असे सांगितले जात आहे की जो व्हिडिओ व्हायरल झाला होता तो दोन वर्षापूर्वीचा होता.

2019 मध्ये रानू मंडलचा एक व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये रानू 'एक प्यार का नगमा है' गाताना दिसली होती. हा व्हिडिओ पाहून हिमेश रेशमीयाने रानूला गाण्याची संधीही दिली आणि रानू स्टार बनली होती. पण रानूचे स्टारडम फार काळ टिकला नाही. सध्या ती कुठे राहते याबद्दल कोणालाच माहिती नाही.

हेही वाचा - कंगनाने परिधान केले पारदर्श ब्रालेट, ट्रोलर्सच्या टीकेला 'क्वीन'चे उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.