ETV Bharat / sitara

प्रेयसी वहिदा रहेमानचा व्हिडिओ पाहून धर्मेंद्रच्या डोळ्यांत 'तरळले अश्रू'! - Dharmenda shy and cry after watching video

धर्मेंद्र यांच्यावर ओशाळण्याचा प्रसंग गुदरला. सुपरस्टार सिंगरच्या मंचावर वहिदा रहेमान यांचा व्हिडिओ पाहून त्यांच्यासह सनी देओलही चकित झाला. त्यानंतरचा व्हिडिओ पाहताना हि-मॅनच्या डोळ्यात अश्रू तरळले.

हि-मॅनच्या डोळ्यात अश्रू तरळले
author img

By

Published : Sep 13, 2019, 5:50 PM IST

Updated : Sep 13, 2019, 7:16 PM IST

मुंबई - हिंदी अभिनेता धर्मेंद्र आज जरी रुपेरी पडद्यापासून दूर असले तरी त्यांचा जलवा कायम आहे. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी ते अजूनही हि-मॅन आहेत. धर्मेंद्र पुत्र सनी देओल यांना याचा प्रत्यय एक शोमध्ये आला. दिग्गज अभिनेत्री वहिदा रहेमान यांनी धर्मेंद्र आपले क्रश होते असे म्हटले होते.

सनी देओल धर्मेंद्र यांच्यासह 'पल पल दिल के पास' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'सुपरस्टार सिंगर'च्या मंचावर पोहोचले होते. या शोचे होस्ट जय भानुशाली याने वहिदा रहेमान यांचा तो व्हिडिओ दाखवला. यात त्यांनी धर्मेंद्र आपले क्रश असल्याचे म्हटले होते.

वहिदा रहेमान यांचा हा व्हिडिओ पाहून धर्मेंद्र ओशाळल्याचे पाहायला मिळाले. यावर उपस्थित प्रेक्षक धमाल करताना दिसले. हे पाहून सनी देओलची प्रतिक्रिया पाहणे मजेशीर होते. त्यालाही हसू आवरले नाही. धर्मेंद्र यांचा हा व्हिडिओ सोनी टीव्हीने शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलंय, "वहिदाजींचे उत्तर ऐकून धर्मेंद्रही लाजले."

'सुपरस्टार सिंगर'च्या या शोमध्ये आणखी एक व्हिडिओ दाखवण्यात आला. हा व्हिडिओ पाहून धर्मेंद्र यांच्या डोळ्यात पाणी तरळले. हा व्हिडिओ होता त्यांच्या पंजाबमधील मुळ गावाचा. याच गावात त्यांनी शिक्षण घेतले आणि रेल्वेच्या लाईनवर बसून मुंबईला पोहोचण्याचे स्वप्नही पाहिले होते. हे पाहताना ते भावूक झाले होते.

धर्मेंद्र सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सध्या ते आपला नातू करण देओल याच्या 'पल पल दिल के पास' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सक्रिय आहेत. हा चित्रपट सनी देओल यांनी दिग्दर्शित केलाय. २० सप्टेंबरला हा चित्रपट दिग्दर्शित होतोय.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 13, 2019, 7:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.