ETV Bharat / sitara

काळानुरुप प्रथा परंपरा बदलणारी धनत्रयोदशी

धनत्रयोदशीचे दिवाळीत वेगळे महत्त्व आहे. या दिवशी लोक सोने आणि भांड्याची खरेदी करतात. शेतीचा पसारा वाढत जाणाऱ्या संस्कृतीशी याचा संबंध आहे. दिवाळी हा सणच कृष्टी संस्कृतीशी निगडीत आहे. त्यामुळे शेतातील धनधान्य घरात आल्यानंतर येणारा हा पहिला आनंदाचा सण धडाक्यात साजरा करण्याची प्राचीन परंपरा आहे. त्यातलाच एक दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा.

author img

By

Published : Nov 2, 2021, 6:43 AM IST

धनत्रयोदशी
धनत्रयोदशी

धनत्रयोदशीचे दिवाळीत वेगळे महत्त्व आहे. या दिवशी लोक सोने आणि भांड्याची खरेदी करतात. शेतीचा पसारा वाढत जाणाऱ्या संस्कृतीशी याचा संबंध आहे. दिवाळी हा सणच कृष्टी संस्कृतीशी निगडीत आहे. त्यामुळे शेतातील धनधान्य घरात आल्यानंतर येणारा हा पहिला आनंदाचा सण धडाक्यात साजरा करण्याची प्राचीन परंपरा आहे. त्यातलाच एक दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा.

धन्वंतरीची पूजा

समुद्रमंथनातून प्रकटलेल्या चौदा रत्नां पैकी एक भगवान धन्वंतरी भूतलावरील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य रक्षणासाठी प्रकट झाले. अशी एक पौराणिक कथा आहे. धन्वंतरी हे विष्णूचे अवतार मानले जातात. दिवाळीचा दुसऱ्या दिवशी भगवान धन्वंतरीची जयंती साजरी करण्यात येते. अलिकडे कोरोनामुळे पुन्हा एकदा आयुर्वेदीक उपचार पद्धतीचे मोठं योगदान लाभल्याचे अधोरेखित झाले आहे. कोरोना काळात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वनस्पतींचा वापर महत्वाचा ठरला आहे.

धन्वंतरीच्या हातात चार आयुधे आहेत एका हातात शंख असून दुसर्‍या हातातील सूर्यदर्शन चक्र हे शल्यचिकित्सक यांचे प्रतीक आहे. तिसऱ्या हातातील जलोका अर्थात जळवा हा प्राणी अशुद्ध रक्त शोषून घेतात. धन्वंतरीला क्षीरतिलावन या दुधाचा नैवद्य दाखवण्याची प्रथा आहे, साळीच्या लाह्या, खवा, बत्तासे, वेलची, सुंठ व किंचित मिरी टाकून दुधामध्ये एकजीव करून मिश्रण तयार केले जाते.

सोने खरेदी

या दिवसाच्या काही पौराणिक कथा आहेत. समुद्र मंथनात सापडलेल्या एकेक वस्तुशी याचा संबंध जोडण्यात येतो. मात्र शेती व्यवसाय करणाऱ्या कास्तकरी समुदायाचा या सणाशी असलेला थेट संबंध समजून घेणे महत्त्वाचे ठरते. एक म्हणजे वर म्हटल्या प्रमाणे सोने आणि भांड्याची खरेदी करण्याचा प्रथा परंपरा आहे. सोने हे वैभवाचे लक्षण आहे. दिवाळी सोने खरेदी करुन आपल्या वैभवात भर टाकण्याची ही परंपरा जपण्यात आली आहे. ही जमलेले सोने प्रसंगी शेतीच्या विकासात भर टाकण्यासाठी मदतकारक ठरते, हा जसा थेट विचार आहे तसाच तो विवाह समारंभापासून अनेक सणसमारंभासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे दर दिवाळीला थोडे थोडे सोने खरेदी करण्याची परंपरा कृषी संस्कृतीत जपण्यात आली आहे.

भांड्यांची खरेदी

धनत्रयोदशीला भांड्यांची खरेदी करण्याचीही परंपरा आहे. विशेषतः पितळेची भांडी खरेदी करण्याची प्रथा दिसून येते. मात्र आता यात बदल झालेलाही पाहायला मिळतो. पूर्वीचा काळी मातीची भांडी वापरण्याची प्रथा होती. ही भांडी दीर्घकाळ टिकत नसतात. याची फुटतूट होतच असते. त्याकाळी धातूची भांडी महाग आणि दुर्मिळही होती. त्यामुळे किमान दिवाळीत तरी पितळेची भांडी खरेद करण्याची प्रथा तयार झाली.

बदलत जाणाऱ्या पंरपरा

धनत्रयोदशीला पितळेची भांडी खरेदी करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. महाभारतात याचे वर्णन आहे की सुर्यदेवाने द्रोपदीला पितळेचे एक अक्षय पात्र दिले होते. तिला वरदान होते की या पात्रात द्रोपदी कितीही लोकांचे जेवण बनवायची. यातून कधीच जेवण कमी पडत नसे. याचा संबंध शेती संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्नही धनत्रयोदशीत लावण्यात येतो. एक म्हणजे वाढत जाणारी कुटुंब संख्या आणि त्यांना पुरेल अशा भांड्याची खरेदी करण्याचा हा दिवस. दुसरे म्हणजे सण समारंभसाठी भांडी खरेदी करण्याचाही हा दिवस मानण्यास सुरुवात झाली असावी. आता धातूंच्या शोधात बराच बदल झालाय. आता धनत्रयोदशीला केवळ भांडीच नाही तर इलेक्ट्रीकल ओव्हनपासून कुकर ते किचनमधील उपयुक्त वस्तुंची खरेदी केली जाते. पितळेची भांडी कलई करुन वापरावी लागतात त्यामुळे स्टेनलेस स्टील, अॅल्यमिनीयम आणि लोखंडाच्या भांड्याचा वापर आज सुलभपणे केला जातो. पितळेच्या ताटाची जागा आता काच, चीनी मातीची भांडी आणि इतर धातूंनी घेतली आहे. हा बदल खेड्यापाड्यातही आता रुजत चाललाय. जशी दिवाळी बदलत आहे तशा धनत्रयोदशीचा प्रथेतही काळानुरुप बदल होत आहे.

हेही वाचा - दिन दिन दिवाळी : गोधनाची पूजा हीच दिवाळीची समृध्द परंपरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.