यवतमाळ - शेतकऱ्याने फक्त शेतीच करावी असं नाही, तर त्याची इतरही स्वप्न असतात. ते पूर्ण करण्यासाठी गरज असते ती इच्छाशक्तीची. याच इच्छाशक्तीच्या जोरावर जय खिल्लारे यांनी गणपती बाप्पावरील एक भक्तीगीत प्रेक्षकांच्या समोर आणले आहे. शेतकऱ्याच्या या गीताला नागरीकांचा भरपूर प्रतिसाद मिळताना दिसतोय.
जय खिल्लारे हे पुसद तालुक्यातील काटखेडा या छोट्याशा गावचे रहिवासी. शेतीत काम करत असताना त्यांनी आपले संगीताचे स्वप्न मनाशी बाळगले. संगीत क्षेत्रात त्यांनी अनेक धून लॉन्च केलीत. मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांची प्रगती होत नव्हती. पण ते म्हणतात ना प्रयत्नाअंती परमेश्वर या म्हणीप्रमाणे आज त्यांनी परमेश्वराचे गाणे लॉन्च केले व आपल्या स्वप्नपूर्ती कडे एक पाऊल टाकले आहे.
गणपती बाप्पाच्या या गाण्याला पुष्पावंती नगरीतीलच नव्हेतर महाराष्ट्रातील जनतेने पसंती दर्शवली आहे. युट्युब वरील या गाण्याला हजारोच्या संख्येत लाईक व शेअर मिळत आहेत. शेतकरी हा फक्त शेतीतच पारंगत आहे असे नाही तर तो इतर क्षेत्रात ही माहिर असल्याचे जय खिल्लारे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
जय खिल्लारे यांना या प्रवासात संगीतकार तसेच सॉंग कंपोजर यांची साथ लाभली. पुसद मधील त्रिदेव चव्हाण व दिलीप राठोड यांच्या सोबत मिळून हरीश गावंडे यांच्या आर्थिक सहकार्याने आज या तिघांनी मिळून गणपती बाप्पा वरील गाणे लॉंच केले आहे. जय खिल्लारे यांचा शेतकरी ते दिग्दर्शक पर्यंतचा प्रवास खरंच इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
हेही वाचा - जाणून घ्या, महेश कोठारे यांनी का मागितली 'जाहीर माफी'?