ETV Bharat / sitara

'मी होणार सुपरस्टार'च्या मंचावर अवतरली खरी खुरी सुपरस्टार - Deepika Padukon latest news

मी होणार सुपरस्टारच्या मंचावर दीपिका पदुकोणने हजेरी लावली. छपाक सिनेमाच्या प्रमोशनसाठी दीपिका मी होणार सुपरस्टारच्या सेटवर आली होती.

Deepika Padukon on Mi Honar Superstar
मी होणार सुपरस्टारच्या मंचावर दीपिका पदुकोण
author img

By

Published : Jan 18, 2020, 8:46 AM IST

स्टार प्रवाहवर सुरु झालेल्या ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. नुकतंच या कार्यक्रमात खास हजेरी लावली ती दीपिका पदुकोणने. छपाक सिनेमाच्या प्रमोशनसाठी दीपिका मी होणार सुपरस्टारच्या सेटवर आली होती. दीपिकाचं सेटवर आगमन होताच सगळा माहोलच बदलून गेला. स्पर्धकांची गाणी ऐकत, त्यांचा उत्साह वाढवत दीपिकाने या मंचावर धमाल उडवून दिली. इतकंच नाही तर या अनोख्या संगीत मैफलीत दीपिका स्वत:ही सामील झाली. धमाकेदार गाणी सादर करत दीपिकाने या मैफलीत अनोखे रंग भरले.

Deepika Padukon on Mi Honar Superstar
दीपिका इन मी होणार सुपरस्टार

खास बात म्हणजे दीपिकासाठी आदर्श शिंदे आणि राहुल देशपांडे यांनी देखील खास गाणी सादर केली, आणि या गाण्यांना दीपिका आणि प्रेक्षकवर्गाकडून दिलखुलास वन्समोअर मिळाला. १८ आणि १९ जानेवारीच्या विशेष भागात दीपिकासोबतची ही खास मैफल पाहायला मिळणार आहे.

Deepika Padukon on Mi Honar Superstar
दीपिका इन मी होणार सुपरस्टार

आदर्श शिंदे, राहूल देशपांडे, मृणाल कुलकर्णी हा शो जज करत असून पुष्कर श्रोत्री या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडत आहे. गाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्या गायकांना या शोद्वारे स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी मिळत आहे.

Deepika Padukon on Mi Honar Superstar
दीपिका इन मी होणार सुपरस्टार

या अनोख्या कार्यक्रमाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘टॅलेण्ट ही अशी गोष्ट आहे ज्याचा कधीही विसर पडत नाही. काही जणांना मात्र आर्थिक परिस्थितीमुळे, घरच्यांचा पाठिंबा न मिळाल्यामुळे आणि अश्या बऱ्याच कारणांमुळे आपलं स्वप्न पूर्ण करता येत नाही. स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार’ हा कार्यक्रम अश्याच स्पर्धकांना दुसरी संधी देत आहे ज्यांचं गाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. संगीत क्षेत्रातले दिग्गज हा कार्यक्रम जज करणार आहेत त्यामुळे स्पर्धकांचं स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरणार आहे. आयुष्यात कधीना कधी दुसरी संधी ही मिळतेच. गाण्याचं स्वप्न पूर्ण करु पाहणाऱ्या स्पर्धकांसाठी ‘मी होणार सुपरस्टार’ हा कार्यक्रम हीच संधी घेऊन आला आहे.’

Intro:स्टार प्रवाहवर सुरु झालेल्या ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. नुकतंच या कार्यक्रमात खास हजेरी लावली ती दीपिका पडुकोणने. छपाक सिनेमाच्या प्रमोशनसाठी दीपिका मी होणार सुपरस्टारच्या सेटवर आली होती. दीपिकाचं सेटवर आगमन होताच सगळा माहोलच बदलून गेला. स्पर्धकांची गाणी ऐकत, त्यांचा उत्साह वाढवत दीपिकाने या मंचावर धमाल उडवून दिली. इतकंच नाही तर या अनोख्या संगीत मैफलीत दीपिका स्वत:ही सामील झाली. धमाकेदार गाणी सादर करत दीपिकाने या मैफलीत अनोखे रंग भरले.

खास बात म्हणजे दीपिकासाठी आदर्श शिंदे आणि राहुल देशपांडे यांनी देखिल खास गाणी सादर केली, आणि या गाण्यांना दीपिका आणि प्रेक्षकवर्गाकडून दिलखुलास वन्समोअर मिळाला. १८ आणि १९ जानेवारीच्या विशेष भागात दीपिकासोबतची ही खास मैफल पाहायला मिळणार आहे.

आदर्श शिंदे, राहूल देशपांडे, मृणाल कुलकर्णी हा शो जज करत असून पुष्कर श्रोत्री या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडत आहे. गाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्या गायकांना या शोद्वारे स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी मिळत आहे.

या अनोख्या कार्यक्रमाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘टॅलेण्ट ही अशी गोष्ट आहे ज्याचा कधीही विसर पडत नाही. काही जणांना मात्र आर्थिक परिस्थितीमुळे, घरच्यांचा पाठिंबा न मिळाल्यामुळे आणि अश्या बऱ्याच कारणांमुळे आपलं स्वप्न पूर्ण करता येत नाही. स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार’ हा कार्यक्रम अश्याच स्पर्धकांना दुसरी संधी देत आहे ज्यांचं गाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. संगीत क्षेत्रातले दिग्गज हा कार्यक्रम जज करणार आहेत त्यामुळे स्पर्धकांचं स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरणार आहे. आयुष्यात कधीना कधी दुसरी संधी ही मिळतेच. गाण्याचं स्वप्न पूर्ण करु पाहणाऱ्या स्पर्धकांसाठी ‘मी होणार सुपरस्टार’ हा कार्यक्रम हीच संधी घेऊन आला आहे.’Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.