मुंबई - सध्या देशभरात कोरोनामुळे घराबाहेर पडणं अशक्य झालेलं आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबतच सेलिब्रिटी देखील घरात बसून आहेत. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या या वेळेचा अभिनेत्री पुरेपूर फायदा घेताना दिसत आहेत.
अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या आपल्या स्वयंपाकघरात रमली आहे. सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणे तिने कोणत्या डब्ब्यात काय सामान भरून ठेवले त्याच्या चिठ्ठ्या करून लावल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
तर अशा परिस्थितीत महिलांना आपल्या सौंदर्याकडे लक्ष कसे द्यावे? असा प्रश्न पडला असेल. मात्र, घरी बसूनही महिलांना आपला लूक सुंदर करता यावा यासाठी अभिनेत्री नीना गुत्ता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करून ब्युटी टिप्स दिल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नीना गुप्ता यांच्याशिवाय इतर अभिनेत्रींनी देखील त्यांच्या वेळेचा कसा सदुपयोग करत आहेत, याची माहिती चाहत्यांशी शेअर करत आहेत.