ETV Bharat / sitara

'ना-करोना-करो', संदीप रानडेंचं गाणं सोशल मीडियावर प्रसिद्ध

या कठीण काळात लोकांनी कशाप्रकारे सुरक्षित राहावं आणि या परिस्थितीत कसं सामोरे जावं, या गोष्टी सांगणारं हे गाणं असल्याचं रानडे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या गाण्याची कलाकारांनी सोशल मीडियावर चांगलीच प्रशंसा केली आहे.

संदीप रानडेंचं गाणं सोशल मीडियावर प्रसिद्ध

author img

By

Published : Apr 3, 2020, 2:53 PM IST

मुंबई - पुण्यातील शास्त्रीय संगीतकार संदीप रानडे यांनी नुकतंच कोरोनावर आधारित गाणं गायलं आहे. या गाण्यातून त्यांनी नागरिकांना घरातच राहण्याची आणि सामाजिक अंतर ठेवण्याची विनंती केली आहे. त्यांचं 'ना करोना करो' हे गाणं सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं आहे.

संदीप रानडेंचं गाणं सोशल मीडियावर प्रसिद्ध

या कठीण काळात लोकांनी कशाप्रकारे सुरक्षित राहावं आणि या परिस्थितीत कसं सामोरे जावं, या गोष्टी सांगणारं हे गाणं असल्याचं रानडे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या गाण्याची कलाकारांनी सोशल मीडियावर चांगलीच प्रशंसा केली आहे. ऑस्कर विजेते ए आर रहमान यांनीदेखील हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.

याशिवाय पद्म विभूषण पुरस्कार विजेते पंडित जसराजी यांनीही या व्हिडिओची प्रशंसा केली आहे. दलेर मेहंदी, शुभा मुंडगल यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तर, सोशल मीडियावरही अनेकजण याला उत्तम प्रतिसाद देत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.