अभिनेता सुबोध भावे त्याची पत्नी मंजिरी आणि मोठा मुलगा कान्हा याना कोरोनाची लागण झाल्याची माहिती खुद्द सुबोध यानेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट द्वारे दिली आहे. सुबोधने काही वेळापूर्वीच ही माहिती आपल्या सोशल मीडिया अकौंटद्वारे आपल्या चाहत्यांना दिली.
सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही तिघे गृह विलगीकरणात असल्याच त्याने स्पष्ट केलं आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार आपल्यावर उपचार सूरु असल्याचं त्याने या पोस्टमध्ये सांगितलं आहे. सुबोध त्याची पत्नी मंजिरी आणि मुलगा कान्हा कोविड पॉझिटिव्ह असले तरीही त्याचा धाकटा मुलगा मल्हार हा सुखरूप आहे. सुबोधने टाकलेल्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून त्यांचे अनेक मित्र आणि फॅन्स यांनी लवकरात लवकर बरं होण्यासाठी आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. तर काहींनी आपल्यासह कुटूंबाची काळजी घेण्याचा प्रेमळ सल्ला सुबोधला देऊ केला आहे.