भारतीय टेलिव्हिजन वरील ‘'बिग बॉस’ हा अतिशय लोकप्रिय शो आहे. त्याच धर्तीवर आता डिजिटल स्पेसमध्ये एक रियॅलिटी शो येऊ घातलाय. यावेळेस स्पर्धक जेल मध्ये बंद असतील आणि त्यांना निरनिराळे टास्क करून विजेतेपदाकडे कूच करता येईल. हा कार्यक्रम कुठल्याही सेन्सॉरशिपच्या पाशात नसल्यामुळे अत्यंत प्रक्षोभक असण्याची दाट शक्यता आहे. एकता कपूर आणि करण बेदी, अनुक्रमे अल्ट बालाजी व एमएक्स प्लेयर या निर्मितीसंस्थांचे सर्वेसर्वा, ‘लॉक अप : बैडएस जेल, अत्याचारी खेल’ ची निर्मिती करीत असून त्यांनी ‘कॉंट्रोव्हर्सी क्वीन’ कंगना रणौतची सूत्रसंचालिका म्हणून नियुक्ती केली आहे.
काही तुरुंग तुम्हाला तोडतात, काही तुम्हाला मजबूत करतात. आपल्याला स्वातंत्र्याची किंमत तेव्हाच कळते जेव्हा आपण तुरुंगात जातो. म्हणून रियालिटी शो 'लॉक अप: बैडएस जेल, अत्याचारी खेल‘ मध्ये १६ वादग्रस्त सेलिब्रिटींना अनेक महिने लॉकअपमध्ये ठेवण्यात येणार असून त्यांच्या सुविधा काढून घेतल्या जाणार आहेत. अशा प्रकारचा नवोपक्रम अद्वितीय आहे आणि भारतात प्रथमच होणार आहे. हा खेळ ७२ दिवस सुरु असणार आहे. ‘लॉक अप’ हा एक मनोरंजक रियॅलिटी शो आहे ज्यामध्ये एक धाडसी सेलिब्रिटी होस्ट, अद्वितीय टास्क्स, ड्रामा असलेल्या भरपूर लढाया आणि मनोरंजक स्पर्धक जे तुरुंगात टिकून राहण्यासाठी काहीही करण्यास तयार असतील. ही सर्व वैशिष्ट्ये मनोरंजनाचे परिपूर्ण मिश्रण ठरतील.
बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत म्हणाली, "अशा अनोख्या आणि अप्रतिम संकल्पनेसह ओटीटी मध्ये प्रवेश करताना मी अत्यंत उत्साही आणि रोमांचित आहे. अल्ट बालाजी आणि एम एक्स प्लेयर या दोन्हींचे स्केल आणि पोच खूप मोठी आहे. मला माझ्या चाहत्यांशी जोडण्याची आणि 'लॉक अप' चे होस्ट म्हणून त्यांचे मनोरंजन करण्याची एक चांगली संधी आहे. मी ‘बॉस लेडी’ एकता कपूर यांचे आभार मानू इच्छिते ज्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. मी नेहमीच तिचे कौतुक करते आणि मला तिच्याबद्दल खूप आदर आहे. माझ्या ओटीटी पदार्पणासाठीही ती माझ्यासोबत आहे याचा मला आनंद आहे. मी माझ्या सर्व चाहत्यांना आतापर्यंतच्या सर्वात निर्भय शोसाठी तयार होण्यास सांगू इच्छिते!"
कंटेंट क्वीन एकता आर. कपूर म्हणाली, “मला भारतातील सर्वात मोठा आणि निर्भय रियॅलिटी शो ‘लॉक अप’ जाहीर करताना खूप आनंद होत आहे, जो प्रतिभावान आणि उत्कृष्ट अभिनेत्री कंगना रणौत कडून होस्ट केला जाईल. कंगना माझी जवळची मैत्रीण आहे आणि मला याचा आनंद आहे. शोची संकल्पना देखील उत्कृष्ट आहे. आणि मला खात्री आहे की ती प्रेक्षकांमध्ये रुची निर्माण करेल आणि रियॅलिटी शोसाठी एक नवीन बेंचमार्क सेट करेल. एमएक्स प्लेयर ने अल्ट बालाजी सोबत भागीदारी केली आहे याचा मला आनंद आहे. या टीमला माझ्या शुभेच्छा आहेत आणि मला खात्री आहे की तो इतिहास रचेल."
करण बेदी, सीईओ, एमएक्स मीडिया म्हणाले, "एमएक्स मीडिया नेहमीच बाजारातील ट्रेंड बदलत आहे. आम्ही आमच्या प्रेक्षकांना आकर्षित करणारी उत्पादने आणि सामग्री तयार करतो आणि यामुळेच आम्हाला भारतातील सर्वात मोठे मनोरंजन व्यासपीठ बनवले आहे. 'लॉक अप' हे भारतीय मनोरंजन परिसंस्थेचा मार्ग बदलण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. भारतात अभूतपूर्व प्रमाणात प्रदर्शित होणारा हा पहिला डिजिटल नॉन-फिक्शन शो आहे."
अल्ट बालाजी व एमएक्स प्लेयर त्यांच्या संबंधित प्लॅटफॉर्मवर चोवीस तास शो लाइव्ह स्ट्रीम करतील, ज्यामुळे दर्शकांना स्पर्धकांशी थेट संवाद साधता येईल. दर्शकांना त्यांच्या निवडलेल्या स्पर्धकांना शिक्षा करण्याचा किंवा बक्षीस देण्याचा किंवा त्यांच्यासाठी बातमी बनण्याचा अधिकार असेल.
एंडेमॉल शाईन इंडिया द्वारे निर्मित, ‘लॉक अप : बैडएस जेल, अत्याचारी खेल’ २७ फेब्रुवारी २०२२ पासून अल्ट बालाजी व एमएक्स प्लेयर वर प्रसारित होईल.
हेही वाचा - पाहा, 'जिंदगानी' सिनेमासाठी अजय गोगावलेने गायलेले ‘सुटले धागे..’ गीत