भोपाळ - रविवारी आश्रम-3 वेब सिरीजच्या शूटिंगदरम्यान तोडफोडीचे प्रकरण समोर आले. या प्रकरणाला आता वेग येत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी यापूर्वीच मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या वेब सिरीजबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आता या वादासंदर्भात चित्रपट जगताशी संबंधित लोकांची विधाने समोर आली आहेत.
रंगभूमी आणि चित्रपटांशी संबंधित अनेक कलाकारांचे मत आहे की प्रकाश झा यांनी हिंदू भावना लक्षात घेऊन वेब सिरीजचे नाव बदलले पाहिजे. त्याचबरोबर भूतनाथ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक शर्मा म्हणाले की, हिंदू धर्माची चेष्टा केली जाऊ नये.
दोन गटात विभागले गेलेत सिनेक्षेत्रातील लोक
आश्रम या वेब सिरीजच्या शूटिंगच्या वादात रंगभूमी आणि चित्रपट जगताशी संबंधित लोकांची मतेही विभागली गेली आहेत. अनेक कलाकार आणि नाट्य कलाकारांचेही असे मत आहे की या सरिजीबाबत वातावरण तयार झाले असले तरी सरकारने कलाकारांच्या आणि युनिटच्या सुरक्षेच्या जबाबदारीकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचवेळी, काही कलाकारांचा असा विश्वास आहे की प्रकाश झा यांनी सिरीज हिट करण्यासाठी हे केले आहे. अशा परिस्थितीत त्याने या वेब सिरीजचे नाव बदलले पाहिजे. कारण या नावाने हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात.
प्रकाश झाने बदलले पाहिजे सिरीजचे नाव
ज्येष्ठ रंगकर्मी आणि चित्रपट कलाकार संजय मेहता म्हणतात की, प्रकाश झा यांनी हिंदू भावना लक्षात घेऊन वेब सिरीजचे नाव बदलले पाहिजे. कारण याआधीही प्रकाश झा यांनी सलग अनेक वेळा चित्रपटाबद्दल वाद निर्माण केले आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटाचे नाव बदलले तर बरे होईल.
धर्माची खिल्ली उडवू नये - विवेक शर्मा
अमिताभ बच्चन स्टारर भूतनाथ या चित्रपटाचा दिग्दर्शक विवेक शर्मा जबलपूरचा रहिवासी आहे. तो म्हणतो की दिग्दर्शकाने चित्रपट बनवावा पण त्याची खिल्ली उडवू नये. हिंदू धर्माविरुद्ध निरर्थक बोलण्याची काहीच गरज निर्मात्यांना नाही. ज्याला पाहावे तो हिंदू धर्माच्या विरोधात बोलत असतो. तुम्ही धर्माच्या मागे हात धुवून का लागला आहात.
मी एक चित्रपट निर्माता देखील आहे, मी कोणत्याही धर्माच्या विरोधात काहीही करत नाही. मी या चित्रपट निर्मात्यांच्या बाजूने नाही. काही दिग्दर्शक केवळ हिंदू धर्माची खिल्ली उडवण्यासाठी चित्रपट बनवतात. हे लोक हे जाणूनबुजून करतात. कारण आजच्या काळात नकारात्मकता ही सर्वात मोठी प्रसिद्धी आहे.
सरकार सिनेक्षेत्रासाठी काम करीत आहे - केजी त्रिवेदी
ज्येष्ठ थिएटर आर्टिस्ट केजी त्रिवेदी म्हणतात की चित्रपटांबाबत मध्य प्रदेशात सरकार चांगले काम करत आहे, परंतु अशा प्रकारे वाद निर्माण केल्याने चित्रपट आणि कलाकार दोघांच्या प्रतिमेवर परिणाम होतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
हेही वाचा - मी आणि माझा नवरा समीर जन्मतः हिंदू, क्रांती रेडकरचे नवाब मलिकांना प्रत्यूत्तर