मुंबई - क्रिकेट असो वा टेलिव्हिजन मालिका, १०० हा आकडा दोघांसाठीही महत्त्वाचा समाजाला जातो. क्रिकेटमध्ये शतक पूर्ण केल्यावर खेळाडूचा व संपूर्ण टीमचा कॉन्फिडन्स वाढतो. त्याचप्रमाणे नवीनच सुरू झालेली मालिका जेव्हा १०० भाग पूर्ण करते, तेव्हा संपूर्ण टीमचा आत्मविश्वास वाढतो. जेव्हा टेलिव्हिजनवरील एखादा शो १०० यशस्वी एपिसोड पूर्ण करतो, तेव्हा तो क्षण नेहमीच आनंदाचा आणि उत्सवाचा असतो आणि लोकप्रियतेचा ठसा असतो. कलर्सचा लोकप्रिय शो 'पिंजरा खूबसूरती का'च्या कलाकारांनी आणि कर्मचाऱ्यांनी नुकताच त्यांचा पहिला प्रगतीदर्शक टप्पा गाठला. संपूर्ण युनिट अत्यंत आनंदात होते आणि त्यांनी भलामोठा केक कापून तो क्षण साजरा केला.
हेही वाचा - फॅशनिस्टा सई ताम्हणकरचे आकर्षक ‘सारी-लूक्स’!
या विशेष प्रसंगी ओंकारची प्रमुख भूमिका करणारा साहिल म्हणाला, “अशा प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण कथा टेलिव्हिजनवर या आधी पहायला मिळाली नव्हती आणि मला या विषयाबाबत खूप आदर आहे. १०० एपिसोड पूर्ण करत असताना, हे माझे मत आहे आणि शोच्या संकल्पनेविषयी मला अभिमान आहे. प्रेक्षकांकडून आम्हाला मिळत असलेले प्रेम व कौतुक हे याचेच लक्षण आहे. पुढे मी एवढेच सांगू शकतो की, शो आता खूपच कुतुहलजनक होत जाणार आहे. सर्व कलाकार आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने हा माइलस्टोन गाठण्यात मदत करण्यासाठी मी प्रेक्षकांचे आभार मानतो.”
१०० एपिसोड पूर्ण करण्याविषयी बोलताना, मयुराची मुख्य भूमिका साकारणारी रिया शर्मा म्हणाली, “सुरुवात करण्याआधी, मी माझे दिग्दर्शक आणि पिंजराच्या संपूर्ण टीमचे आभार मानू इच्छिते, ज्यांनी अशा प्रकारचा शानदार शो बनवण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. मला मिळणारा प्रतिसाद भारावून टाकणारा आहे आणि तुमच्या सर्व कष्टांचे कौतुक झालेले खूप छान वाटते. आम्ही खूप छान समारंभ साजरा केला आणि हा माइलस्टोन गाठल्या बद्दल सर्वांनाच खूप आनंद झाला होता. मला माहीत आहे की, ही फक्त सुरूवात आहे आणि आमच्या प्रेक्षकांच्या प्रेमासह असेच अजून भविष्यात पहायला मिळेल.”
‘पिंजरा खूबसूरती का’ प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता कलर्सवर प्रसारित होतो.
हेही वाचा - सर्वांर्थानं आजच्या पिढीचं प्रतिनिधीत्व करणारा चित्रपट, ‘हॅशटॅग प्रेम’!