ETV Bharat / sitara

क्लास ऑफ ८३ : सरळमार्गी पोलिसाच्या भूमिकेतून बॉबी देओल करतोय डिजीटल डेब्यू - बॉबी देओल लवकरच नेटफ्लिक्सवर

अभिनेता बॉबी देओल लवकरच नेटफ्लिक्सवर डिजीटल पदार्पण करण्यासाठी सज्ज होतोय. शाहरुख खानचे प्रॉक्शन असलेल्या क्लास ऑफ ८३ या फिल्ममध्ये तो पोलिसाच्या भूमिकेत दिसेल. निर्मात्याने या शोमधील बॉबी देओलचा फर्स्ट लूक शेअर केलाय. यात तो एका सरळमार्गी पोलीस वाटत आहे.

Class of 83 first look
क्लास ऑफ ८३
author img

By

Published : Jul 16, 2020, 1:32 PM IST

मुंबई - शाहरूख खानच्या प्रॉडक्शनच्या नेटफ्लिक्सवरील क्लास ऑफ ८३ या फिल्मचा फर्स्ट लूक प्रसिद्ध झाला आहे. या चित्रपटाद्वारे बॉबी देओल डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करीत आहे.

अतुल सभरवाल दिग्दर्शित चित्रपटात बॉबी देओल डीन विजय सिंग ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. या चित्रपटाची कथा प्रशिक्षक बनलेल्या सरळमार्गी पोलिसाची आहे, जो विद्यार्थ्यांना सन्मान, नैतिकता आणि देशप्रेम शिकवतो. निर्मात्यांनी बॉबीचा लूक सोशल मीडिया हँडल्सवर पोस्ट केल्यानंतर बॉबीने ट्विटरवरुन युनिफॉर्म घातल्याचा अनुभव शेअर केला आहे. डीन विजय सिंगची भूमिका करताना पूर्वी कधीही न आलेला अनुभव घेतल्याचे बॉबीने म्हटले आहे. क्लास ऑफ ८३मध्ये १७ मूळ कथा नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार असून काही महिन्यातच या कथा स्ट्रीमरवर उपलब्ध होतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.