‘चला हवा येऊ द्या’ मधील थुकरट वाडी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. थुकरटवाडीचे ‘रहिवासी’ तमाम प्रेक्षकांचे धमाल मनोरंजन करीत असतात. कसे आहात मंडळी मजेत ना, आणि हसताय ना, असे आपुलकीने विचारत वर्षानुवर्षे प्रेक्षकांचा अविरत आणि सातत्याने भरभरून मनोरंजन करणारी टीम म्हणजे चला हवा येऊ द्या ची विनोदी टीम. डॉक्टर निलेश साबळे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, सागर कारंडे, कुशल बद्रिके हे सहा अवलिया इतर कलाकारांसोबत अनेक विनोदी स्किट सादर करत आज पर्यंत प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनले आहेत. या मंचावर प्रेक्षकांचे आवडते कलाकार देखील हास्याचा डोस अनुभवण्यासाठी सज्ज होतात.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या आठवड्यात झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेतील कलाकारांची फौज थुकरट वाडीत सज्ज होणार आहे. मालिकेची संपूर्ण टीम चला हवा येऊ द्या मध्ये सज्ज झाल्यावर मालिकेवर बेतलेले थुकरट वाडीचे ‘थट्टा-स्किट’ प्रेक्षकांना पाहायला मिळते. त्यामुळे चला हवा येऊ द्या मधील सगळे विनोदवीर हे ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेवर एक विनोदी प्रहसन सादर करणार आहेत. सिड आणि अदितीच्या भूमिकेत श्रेया बुगडे आणि भाऊ कदम सगळ्यांना हसून हसून लोटपोट होण्यास भाग पाडणार आहेत.
‘चला हवा येऊ द्या’ हा विनोदी कार्यक्रम सोमवार ते बुधवार झी मराठीवर प्रसारित होतो.
हेही वाचा - 'सुमन एंटरटेन्मेंट'च्या पहिल्या हिंदी गाण्यात झळकणार मराठी अभिनेत्री पूजा सावंत!