लॉस एंजेलिसः 'इन प्लेन साइट' आणि 'रेट्रीब्यूशन' यासारख्या टीव्ही शोचा बालकलाकार जॅक बर्न्स याचे निधन झाले आहे. १४ वर्षे वय असलेला जॅक त्याच्याच घरात मृत अवस्थेत आढळून आला. पोलीस अधिकाऱ्यांनी मृत्यू कसा झाला? याचा खुलासा अद्याप केलेला नाही.
'द नेक्स्ट बिली इलियट'मध्ये डबिंग करणाऱ्या जॅक बर्न्स याला स्कॉटलंडच्या ग्रीनकुकमध्ये स्वतःच्या घरात १ डिसेंबरला मृतावस्थेत पाहण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार त्याच्या मृत्यूच्या कारणांचा तपास सुरू आहे.
याबाबत बोलताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की कोणावरही संशय नसला तरी मृत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. जॅक बर्न्सने 'आउटलैंडर' आणि 'प्लेन साइट' या टीव्ही शोमध्ये काम केले होते. त्याने 'द नेक्स्ट बिली इलियट' मध्ये डबिंग केले होते.
जॅक हा सेंट कॉलम्बा स्कूलचा विद्यार्थी होता. तसेच तो एलिट अॅकॅडमी ऑफ डान्सचाही तो सदस्य होता. अॅकॅडमीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात लिहिलंय, ''आम्ही खूप दुःखी मनाने पोस्ट लिहित आहोत. आमचा सर्वात चांगला विद्यार्थी आम्ही गमावला आहे. जॅक आमच्यासाठी प्रेरणा होता. त्याने सर्वांची मने जिंकली होती. त्याच्या जाण्याने कुटुंबीयांना धक्का बसलाय. यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत.''