ETV Bharat / sitara

सर्वांनी घरी राहून आंबेडकर जयंती साजरी करा, मराठी कलाकारांकडून आवाहन

बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने घरातच राहून साजरी करा बाहेर पडू नका असे आव्हान मराठी कलाकारांनी केले आहे.कलाकारांनकडून नागरिकांना भावनिक आवाहन करण्यात आले आहे.

celebrate-ambedkar-jayanti-at-home
celebrate-ambedkar-jayanti-at-home
author img

By

Published : Apr 14, 2021, 12:14 AM IST

Updated : Apr 14, 2021, 12:19 AM IST

मुंबई - सालाबादप्रमाणे महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पण सर्व ठिकाणी कोरोना रोगाने थैमान घातले असून कित्येक लोकांना या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे सांगितले जात आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात भिमजयंती साजरी केली जाते. मोठ्या प्रमाणात लोक एकत्र जमून बाबासाहेबांना अभिवादन करतात. मात्र कोरोनामुळे यावर्षी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपआपल्या घरीच राहून साजरी करा, असे आवाहन मराठी कलाकारांकडून केले जात आहे.

मराठी कलाकारांकडून आवाहन
नागरिकांनी घराबाहेर न पडता सर्वांनी घरातच राहून जयंती साजरी करावी आणि प्रशासनास सहकार्य करावे. डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंतीला कोणीही बाहेर पडू नये. ठरल्या प्रमाणे सकाळी १०:३० वाजता आपल्या घरीच राहून प्रतिमेचे पूजन करून सायंकाळी घरातच, गॅलरीत, ओट्यावर मेणबत्ती लावून बाबासाहेबांना अभिवादन करून वंदना घ्यावी. असेही आव्हान त्यावेळी कलाकारांनी केले. मराठी कलाकार भाऊ कदम, गौरव मोरे, पॅडी कांबळे इत्यादी कलाकार यांनी असे भावनिक आवाहन केले.

Last Updated : Apr 14, 2021, 12:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.