ETV Bharat / sitara

लिएंडर पेस आणि महेश भूपती यांच्या नात्यात काय झाले, कसे झाले आणि का झाले हे उलगडून सांगणारी मालिका 'ब्रेक पॉईंट' - mahesh bhupathi

दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आणि महेश भूपती यांचे टेनिस कोर्टवरील व त्यामागचे जीवन आणि त्यांच्या प्रतिष्ठित ऑन-कोर्ट भागीदारीवर आधारित मालिका घेऊन आले आहेत. 'ब्रेक पॉईंट' असे नाव असलेली ही ७ भागांची मालिका झी5 ओरिजिनल सीरीज असून त्याचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले.

http://10.10.50.85//maharashtra/28-August-2021/mh-mum-ent-leander-paes-mahesh-bhupati-break-point-mhc10001_28082021204011_2808f_1630163411_826.jpeg

author img

By

Published : Aug 28, 2021, 9:20 PM IST

बॉलिवूडमधील नवरा-बायको-दिग्दर्शक-जोडी अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी, दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आणि महेश भूपती यांचे टेनिस कोर्टवरील व त्यामागचे जीवन आणि त्यांच्या प्रतिष्ठित ऑन-कोर्ट भागीदारीवर आधारित मालिका घेऊन आले आहेत. 'ब्रेक पॉईंट' असे नाव असलेली ही ७ भागांची मालिका झी5 ओरिजिनल सीरीज असून त्याचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या मालिकेतून असं वाटतंय की ‘ली-हेश’ ची जीवश्च कंठश्च मैत्री आणि त्यानंतर आलेला ब्रेक-अप याबाबत अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं त्यांच्या चाहत्यांना लवकरच मिळणार आहेत.

https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-leander-paes-mahesh-bhupati-break-point-mhc10001_28082021204011_2808f_1630163411_760.jpeg
ब्रेक पॉईंटचे पोस्टर
'ब्रेक पॉईंट' ही त्यांची मैत्री, बंधुता, भागिदारी, विश्वास, कठोर मेहनत आणि महत्वाकांक्षा यावर आधारित आहे. ती १९९०च्या दशकाच्या उत्तरार्धातील सर्वात धोकादायक दुहेरी जोडी होती आणि वर्ष १९९९ पर्यंत जगात पहिल्या क्रमांकावर होती. पण ही सिरीज त्यांच्या कटू दुराव्यावर देखील प्रकाश टाकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही दोन मित्रांची कथा आहे ज्यांनी यशाची योजना आखली परंतु यशानंतरच्या जीवनाची नाही.'ब्रेक पॉईंट'च्या दिग्दर्शनाविषयी बोलताना, अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी म्हणाले की, "झी5 सारख्या घराघरात पोहोचलेल्या व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लेटफॉर्मवर अशा तऱ्हेच्या सीरीजला दाखवण्यात येणार आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. महेश भूपती आणि लिएंडर सारख्या आयकॉन्ससोबत काम करणे अद्भुत होते आणि त्यांची अव्यक्त कहाणीला आम्ही पडद्यावर उतरवणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. ही भावना आम्ही नेहमीच जपून ठेवू इच्छितो.”लियांडर पेसने याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "मी अश्विनी अय्यर तिवारी, नितेश तिवारी यांच्यासारख्या अद्भुत कथाकारांसोबत 'ब्रेक पॉईंट'साठी पुन्हा भूतकाळाची सफर केली आहे, जी आनंददायी ठरली आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊ इच्छितोय. त्यांनी माझ्या आणि महेशच्या पार्टनरशिपबद्दल उत्तम रीतीने जगासमोर मांडले आहे. आमच्या ऑफ-कोर्ट केमिस्ट्रीबाबत केवळ अनुमान लावण्यात आले होते. आता ते पहिल्यांदाच आमच्या चाहत्यांना हे सगळे पहायला मिळणार आहे. महेश आणि मी भारताला विश्व टेनिसच्या नकाशावर वर आणण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे आणि आम्हाला आनंद आहे की आम्हाला आमची कहाणी जगासमोर मांडण्याची संधी मिळत आहे.”महेश भूपतीने संगितले की, "हा प्रवास पुन्हा जिवंत करणे आणि शक्य तितक्या स्पष्ट आणि प्रामाणिक मार्गाने सादर करणे, हे एक मोठे पाऊल आहे. मला आनंद आहे की आमच्या चाहत्यांना आमचा हा प्रवास पहायला मिळणार आहे. माझी आणि लिएंडरचे कष्ट, चिकाटी, बंधुता आणि आणि आनंदाश्रू हे सर्व दिसून येईल. 'ब्रेक पॉईंट' ही सिरीज निश्चितच सर्वांसाठी एक ट्रिट असणार आहे आणि हे सर्व पुन्हा अनुभवू देण्यासाठी मी, अश्विनी व नितेश आणि झी5चा आभारी आहे."अनेक दशकांपासून, भारतीयांनी देशाच्या लियांडर पेस आणि महेश भूपती या दिग्गज टेनिसपटूंचा गौरव केला आहे. ज्यांनी अनेक प्रतिष्ठित सामने जिंकून भारताचा सन्मान वाढवला आहे. त्यांच्या सार्वजनिकपणे विभक्त होण्यामागचे अंदाज लावले गेले होते. तथापि, पहिल्यांदाच, या सर्व अटकळींना विश्रांती दिली जाईल कारण पेस आणि भूपती त्यांच्या नात्याबद्दल आणि ब्रेकअपबद्दल स्पष्ट आणि प्रामाणिकपणे जगाला सांगतील- काय झाले, कसे झाले आणि का झाले ते. ‘ब्रेक पॉईंट’ केवळ त्यांच्या महान टेनिस सामन्यांवरच नाही तर कोर्टवर आणि कोर्टबाहेरील त्यांच्या नातेसंबंधावर प्रकाश टाकेल.'ब्रेक पॉईंट' चित्रपट निर्माते, अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी यांच्या बॅनर अर्थस्काय पिक्चर्स आणि झी5च्या अंतर्गत निर्मित असून ही नवरा-बायको जोडी पहिल्यांदाच एकत्रितपणे सह-दिग्दर्शन करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.