मुंबई - आठवड्याच्या सुरुवातीला दर शुक्रवारी काही चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होतात. आज (९ ऑगस्ट) सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिनीती चोप्रा यांचा 'जबरिया जोडी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला आहे. मात्र, त्यांना टक्कर देण्यासाठी हॉलिवूड आणि साऊथचे चित्रपटही सज्ज झाले आहेत. त्यामुळे 'जबरिया जोडी'ला चांगलीच टक्कर मिळण्याची शक्यता आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिनीती चोप्राच्या 'जबरिया जोडी' चित्रपटामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या युवक युवतीची कथा दाखवण्यात आली आहे. याच चित्रपटाच्या शर्यतीत हॉलिवूडचा 'डोरा अँड द लास्ट सिटी ऑफ गोल्ड' हा चित्रपट उतरला आहे.
![jabriya jodi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4084202_jabriya.jpg)
'डोरा अँड द लास्ट सिटी ऑफ गोल्ड' -
हा एक अॅडव्हेंचर चित्रपट आहे. यामध्ये 'डोरा'ची भूमिका इझाबेला मोनेर ही साकारत आहे. जेम्स बोबिन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
![dora and the last city of dream](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4084202_dora.jpg)
'नेरकोंडा पारवाई' -
बॉलिवूड चित्रपट 'पिंक'चा रिमेक असलेला 'नेरकोंडा पारवाई' हा चित्रपटही ८ ऑगस्टलाच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेता अजित दिसणार आहे. बोनी कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राघवेंद्र, श्रद्धा श्रीनाथ, एंड्रिया तारियांग और अभिरामी वेंकटचलाम हे कलाकारही या चित्रपटात झळकले आहेत.
![ajit](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4084202_nerkonda.jpg)
'मनमधुदु २' -
अक्किनेनि नागार्जुन यांचा 'मनमधुदु २' हा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल रविंद्रन यांनी केले आहे. या चित्रपटात नागार्जुनसोबत रकुल प्रीतची मुख्य भूमिका आहे.
![nagarjun](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4084202_naga.jpg)