मुंबई - एमटीव्ही रोडीजचा विजेता आणि बिग बॉस २ चा विजेता ठरलेल्या आशुतोष कौशिक याने लॉकडाऊनच्या काळात अर्पिता हिच्यासोबत विवाह केला आहे. लग्नात होणारा खर्च त्याने पीएम केअर फंडासाठी दिला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे सध्या लॉकडाऊन सुरू आहे. याकाळात आशुतोष कौशिकचा विवाह अलिगडच्या अर्पितासोबत निश्चित झाला होता. दोन्ही घरातून लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली होती. २६ एप्रिल हा दिवस लग्नासाठी निवडण्यात आला होता. लॉकडाऊमुळे सर्व कायद्याचे पालन करीत त्यांचा विवाह पार पडला.
आशुतोष आणि अर्पिता यांचा विवाह नोएडा येथे साध्या पध्दतीने पार पडला. मोजक्या लोकांच्या साक्षीने त्यांनी सात फेरे घेतले. आशुतोषने आपल्या फेसबुकवरून ही माहिती चाहत्यांना शेअर केली आहे.