मुंबई - अमिताभ बच्चन यांनी दिग्गज अभिनेता ऋषी कपूर यांना अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली वाहिली आहे. त्यांच्या '१०२ नॉट आऊट' या चित्रपटातील रिक्रिएटेड गाणे त्यांनी शेअर केले आहे.
अमिताभ यांनी आपल्या सोशल मीडियावरून हा सुंदर भावनिक म्युझिक व्हिडिओ शेअर केला आहे. अमिताभ यांच्या आवाजातील 'वक्त ने किया क्या हसीं सितम' हे रिक्रिएटेड गाणे ऋषी आणि अमिताभ यांच्यातील नाते अधोरेखीत करणारे आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'वक्त ने किय क्या हसीं सितम' हे मूळ गाणे १९५९ मध्ये आलेल्या 'कागज के फूल' या चित्रपटातील आहे. गुरुदत्त यांच्या चित्रपटातील हे गाणे कैफी आझमी यांनी लिहिले होते आणि त्याला एसडी बर्मन यांनी संगीतबध्द केले होते. या गाण्याचे रिक्रिएशन २०१८ मध्ये रोहन-विनायक यांनी केले होते.
अमिताभ यांनी शेअर केलेल्या गाण्याला त्यांनी कॅप्शन दिलंय, 'वक्त ने किया क्या हसीं सितम'
या गाण्यामध्ये '१०२ नॉट आऊट' चित्रपटातील ऋषी कपूर आणि अमिताभ यांचीदृष्ये दिसतात.
अमिताभ आणि ऋषी कपूर यांनी कभी कभी, अमर अकबर अँथोनी, नशिब, कुली आणि अजुबा या चित्रपटातून भूमिका केल्या होत्या.
ऋषी कपूर गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंजत होते. अखेर ३० एप्रिलला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूड दुख:त आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी अमिताभ यांनीच पहिल्यांदा ट्विट करून दिली होती.