ETV Bharat / sitara

'खरे की खोटे, जिथे सारे मुखवटे', महेश मांजरेकरांचे धमाल रॅप रिलीज; 'या' दिवसापासून रंगणार बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व

एक रॅपचिक गोष्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची पोस्ट महेश मांजरेकर यांनी शेअर केली होती. यावरून ते काय सांगणार आहेत, याची आतुरता प्रेक्षकांना होती. त्यांच्या आवाजात बिग बॉस मराठीचे टायटल ट्रॅक बनवण्यात आले आहे. '

author img

By

Published : May 14, 2019, 7:51 AM IST

'खरे की खोटे, जिथे सारे मुखवटे', महेश मांजरेकरांचे धमाल रॅप रिलीज

मुंबई - छोट्या पडद्यावर मराठी बिग बॉसचे पहिले पर्व चांगलेच रंगले होते. पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता बिग बॉस मराठीचे दुसरे पर्वदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दुसऱ्या पर्वाच्या टीजरपासूनच बिग बॉसची चर्चा आहे. यंदाच्या या पर्वात कोणते कलाकार सहभागी होणार, याचीही प्रेक्षकांना आतुरता आहे. महेश मांजरेकरांनी अलिकडेच एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली होती. आता त्यांच्या आवाजातील धमाल रॅप रिलीज करण्यात आले आहे.

एक रॅपचिक गोष्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची पोस्ट महेश मांजरेकर यांनी शेअर केली होती. यावरून ते काय सांगणार आहेत, याची आतुरता प्रेक्षकांना होती. त्यांच्या आवाजात बिग बॉस मराठीचे टायटल ट्रॅक बनवण्यात आले आहे. 'खरे की खोटे, जिथे सारे मुखवटे...' अशांची गोष्ट घेऊन येतोय', असे कॅप्शन देत त्यांनी या कार्यक्रमाची तारीख जाहीर केली आहे.

२६ मेपासून बिग बॉसचे दुसरे पर्व छोट्या पडद्यावर रंगणार आहे. या कार्यक्रमात कोण कोण सहभागी होणार आहे, याचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यामध्ये राजकारणी, लावणी कलाकार आणि प्रवचनकार दिसण्याची शक्यता असल्याचा अंदाज प्रेक्षक व्यक्त करत आहेत.

आता २६ मेच्या दिवशीच या कलाकारांचा खुलासा होईल. बिग बॉसच्या पहिल्या पर्वात मेघा धाडे ही विजयी ठरली होती. आता दुसऱ्या पर्वात कोण बाजी मारणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Intro:Body:

Ent News

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.