मुंबई - बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन होळीच्या जुन्या आठवणीत रमलेले दिसले. बिग बी यांनी इन्स्टाग्रामवर आठवणींना उजाळा देणारे काही दुर्मिळ फोटो शेअर केले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अमिताभ यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये आरके स्टुडिओतील काही फोटोंचा समावेश आहे. यात दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगारंग होळीचे सेलेब्रिशन सुरू असल्याचे दिसते. यामध्ये राज कपूर, शम्मी कपूर, जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा आणि इतर दिग्गज कलाकार फोटोमध्ये दिसतात.
फोटोच्या कॅप्शनमध्ये अमिताभ यांनी लिहिलंय, ''आरके स्टुडिओतील होळी...द बेस्ट...राज कपूरजी...शम्मी कपूरजी.''
अमिताभ यांनी आपल्या तरुणाईतील काही होळीचा रंग उधळतानाचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोत प्रतीक्षा बंगल्यातील होळीमध्ये जया बच्चन आणि अभिषेक रंग खेळताना दिसत आहे. अभिषेकच्या बालपणीचा हा फोटो आहे.
कामाच्या पातळीचा विचार करता अमिताभ बच्चन यांचा 'झुंड' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. नागराज मंजुळे यांच्या बॉलिवूड दिग्दर्शकिय पदार्पणाच्या चित्रपटाचा टिझर रिलीज झालाय. या चित्रपटाच्या ट्रेलरची आता प्रतीक्षा सुरू आहे.