मुंबई - अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या 'भूत' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांना ट्रेलरची उत्सुकता होती. आता ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचेल यात शंका नाही.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये 'हॉन्टेड शिप'चा थरार पाहायला मिळतो. त्या जहाजामध्ये नेमकं काय घडलेलं असतं, याचा शोध घेण्यासाठी निघालेला विकी कौशल कसा भुताच्या जाळ्यात अडकतो, याची भयावह झलक या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे.
-
Spooky and scary... The expectations, obviously, multiply after watching #BhootTrailer... #Bhoot Part One: #TheHauntedShip to release on 21 Feb 2020... Trailer link: https://t.co/07beJhF4gT
— taran adarsh (@taran_adarsh) February 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Spooky and scary... The expectations, obviously, multiply after watching #BhootTrailer... #Bhoot Part One: #TheHauntedShip to release on 21 Feb 2020... Trailer link: https://t.co/07beJhF4gT
— taran adarsh (@taran_adarsh) February 3, 2020Spooky and scary... The expectations, obviously, multiply after watching #BhootTrailer... #Bhoot Part One: #TheHauntedShip to release on 21 Feb 2020... Trailer link: https://t.co/07beJhF4gT
— taran adarsh (@taran_adarsh) February 3, 2020
हेही वाचा -'सियाचीन वॉरिअर्स'च्या निर्मितीसाठी नितेश तिवारी अन् अश्विनी अय्यर तिवारी येणार एकत्र
विकी कौशलसोबत भूमी पेडणेकर देखील या चित्रपटात झळकणार आहे. भानू प्रताप सिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -'बागी ३' च्या पहिल्या पोस्टरमध्ये टायगरचा दमदार अवतार, ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित