मुंबई - म्युझिक रियालिटी शोमध्ये स्वतःच्या आवडीचं गाणं निवडून ते सादर करणं तसं सोप्प असतं. ‘इंडियन आयडल मराठी' (Indian Idol Marathi) मधूनही याला पुष्टी मिळाली. पण जेव्हा परीक्षक गाणं देतात, तेव्हा त्या गाण्याला पूर्णपणे न्याय देणं, परीक्षकांच्या अपेक्षांना खरं उतरणं हे जबाबदारीचं काम असतं. या आठवड्यात स्पर्धकांची खरी परीक्षा होती. कारण स्पर्धकांना गायचं होतं परीक्षकांच्या आवडीचं गाणं! हे आव्हान सगळ्या स्पर्धकांनी अगदी चोख उचललं.
भाग्यश्रीचा 'झिंगाट परफॉर्मन्स'
सोनी मराठी वाहिनीवरील फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. 'इंडियन आयडल मराठी’ हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. विजेतेपदासाठी सुरांची चांगलीच टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे. अजय-अतुल यांच्यासारखे लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक स्पर्धकांना उत्तम मार्गदर्शन करत असल्याने स्पर्धकांचा जोश वाढतो आहे.
हेही वाचा - Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha : पोस्को न्यायालयात गुन्हा दाखल करण्याची मागणी; सुनावणी 7 फेब्रुवारीला