ETV Bharat / sitara

‘बाप बीप बाप': वडील व मुलातील अबोल नात्याचा बोलका प्रवास उलगडला लॉकडाऊनमुळे! - वडील -मुलाच्या नात्यावरील वेबसिरीज ‘बाप बीप बाप'

वडील -मुलाचे नाते हे नेहमीच तणावपूर्ण आणि संवेदनशील राहिले आहे. मुलाची आईसोबत जितकी जवळीक, मैत्रीपूर्ण नाते असते, तितकीच भीती, दरारा वडिलांबाबत असतो. एकमेकांमध्ये सुसंवाद नसतो, अनेकदा एकमेकांविषयी प्रेम असूनही ते व्यक्त करण्यासाठी दोघेही संकोच करतात. अशा या गुंतागुंतीच्या नात्यावर भाष्य करणारी 'बाप बीप बाप' वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर येत्या ३१ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Father-son relationship webseries 'Baap Beep Baap'
वडील -मुलाच्या नात्यावरील वेबसिरीज ‘बाप बीप बाप'
author img

By

Published : Aug 21, 2021, 4:10 PM IST

मुलगा नेहमीच भावनिक आणि मानसिकदृष्ट्या आईच्या जवळचा असतो. वडिलांसोबत प्रेम, आदर असतोच परंतु एक प्रकारचा धाकही असतो. मुलं शक्यतो वडिलांजवळ व्यक्त होत असतात. अशाने त्यांच्या नात्यातील दरी अधिकच खोल होत जाते. अगदी याच प्रकारचे नाते आहे ‘बाप बीप बाप' मधील वडील व मुलामध्ये. नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून वडील व मुलाचे अवघड नाते यात दिसत आहे. लॉकडाऊन आधी कधीच एकत्र वेळ न घालवलेल्या वडील-मुलाला जेव्हा लॉकडाऊनमुळे नाईलाजास्तव एकमेकांबरोबर वेळ घालवावा लागतो तेव्हा नक्की काय होते, या काळात नात्यातील संवाद गवसतो का, त्यांच्या नात्याचा हा गुंता सुटतो का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वरील 'बाप बीप बाप' मध्ये मिळणार आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

वडील -मुलाचे नाते हे नेहमीच तणावपूर्ण आणि संवेदनशील राहिले आहे. मुलाची आईसोबत जितकी जवळीक, मैत्रीपूर्ण नाते असते, तितकीच भीती, दरारा वडिलांबाबत असतो. एकमेकांमध्ये सुसंवाद नसतो, अनेकदा एकमेकांविषयी प्रेम असूनही ते व्यक्त करण्यासाठी दोघेही संकोच करतात. अशा या गुंतागुंतीच्या नात्यावर भाष्य करणारी 'बाप बीप बाप' वेबसीरिज असून त्याचे दिग्दर्शन केलंय अमित कान्हेरे यांनी. या वेबसीरिजमध्ये शरद पोंक्षे, शिल्पा तुळसकर, पर्ण पेठे, तेजस बर्वे, उदय नेने हे मुख्य भूमिकेत आहेत.

Father-son relationship webseries 'Baap Beep Baap'
वडील -मुलाच्या नात्यावरील वेबसिरीज ‘बाप बीप बाप'

'बाप बीप बाप' बद्दल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले, ''वेगवेगळे विषय हाताळल्यानंतर आता एक कौटुंबिक वेबसीरिज घेऊन आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आलो आहोत. लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी काही सकारात्मक गोष्टीही नक्कीच घडल्यात. सतत कामामध्ये व्यस्त असलेली नाती या काळात उमलली व बहरलीसुद्धा. कुटुंबाने एकत्र वेळ घालवला. यात अनेक नाती घट्ट झाली. त्यापैकीच एक मुलाचे आणि वडिलांचे. वडील-मुलाचे संवेदनशील नाते 'बाप बीप बाप' या वेबसीरिजमध्ये अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. ही वेबसीरिज प्रत्येक वडील आणि मुलाच्या हृदयाला स्पर्श करून त्यांच्या नात्याला नवी संजीवनी देईल, याची मला पूर्ण खात्री आहे.''

अमित कान्हेरे यांनी थोडेसे अबोल, संकोच असलेले हे नाते उगीचच गंभीर न करता अतिशय गोड आणि हलक्या फुलक्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडले आहे. या वेबसीरिजचे लेखन प्रतिक उमेश व्यास आणि अमित कान्हेरे यांनी केले असून संवाद योगेश जोशींनी लिहिले आहेत तर छायाचित्रणाची धुरा विशाल सांघवाई यांनी सांभाळली आहे.

अशा या गुंतागुंतीच्या नात्यावर भाष्य करणारी 'बाप बीप बाप' वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर येत्या ३१ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हेही वाचा -तापसी पन्नू व गुलशन देवय्या नैनितालमध्ये करताहेत 'ब्लर'चे शुटिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.