ETV Bharat / sitara

काय सांगता? 'बागी ३'च्या गाण्यावर चोरीचा आरोप, 'या' गाण्याची आहे कॉपी - Baaghi 3 song

सुप्रसिद्ध कंपोजर आणि लेखक रेने बेनेडली यांचे हे गाणे असल्याने 'बागी ३'च्या गाण्याने कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Baaghi 3 new song Do you love me a copy of Troiboy song
काय सांगता? 'बागी ३'च्या गाण्यावर चोरीचा आरोप, 'या' गाण्याची आहे कॉपी
author img

By

Published : Feb 28, 2020, 12:51 PM IST

मुंबई - अभिनेत्री दिशा पाटणीवर चित्रीत झालेलं 'बागी ३'चं नवं गाणं 'डू यू लव्ह मी' हे अलिकडेच सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात दिशाचा सिझलिंग डान्स मुव्ह्ज पाहायला मिळतात. तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लुकवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. मात्र, या गाण्यावर चोरीचा आरोप झाल्याने या गाण्याची चर्चा सध्या पाहायला मिळत आहे.

होय, 'डू यू लव्ह मी' या गाण्याच्या डान्स मुव्ह्ज पासून ते पोस्टरपर्यंत हे गाणं कॉपी असल्याचं म्हटलं गेलं आहे. सुप्रसिद्ध कंपोजर आणि लेखक रेने बेनेडली यांचे हे गाणे असल्याने 'बागी ३'च्या गाण्याने कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -दिशा पाटणीचा आत्तापर्यंतचा सर्वात बोल्ड आणि ग्लॅमरस डान्स, पाहा 'बागी ३'चं गाणं

या गाण्याच्या रिक्रियेटेड व्हर्जनला निकिता गांधीने गायले आहे. तर, तनिष्क बागचीने संगीत दिलं आहे. हे गाणं ट्रॉयबॉयच्या 'डू यू लव्ह मी' गाण्याची कॉपी असल्याचा आरोप डायट सब्याच्या पेजवरही करण्यात आला आहे.

ट्रॉयबोईने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्येही याचा निषेध केला आहे. किती विडंबना आहे. 'माझं नवीन गाणं हे भारतासाठी समर्पित होतं. त्यानंतर अशाप्रकारे या गाण्याचं रिक्रियेशन झालं आहे...', असं त्यांनी या स्टोरीमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा -तमिळ अ‌ॅक्शन थ्रिलर 'कायथी'च्या रिमेकमध्ये बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची वर्णी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.