मुंबई – बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे आयुष्मान खुराना. 'विकी डोनर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या आयुष्मानने नेहमीच आपल्या हटके भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या आठ वर्षात त्याने सर्वसामान्य व्यक्तींच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. आपल्या हटके चित्रपटांमुळे तो सर्वसामान्यांचा हिरो म्हणून ओळखला जातो. आपल्या अभियामुळे त्याने राष्ट्रीय पुरस्कारावरही मोहर उमटवली आहे. त्यामुळे हा आठ वर्षाचा प्रवास खूप काही शिकवणारा होता, असे आयुष्मानने सांगितले आहे.
बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये स्थान मिळवण्यापर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. पण, प्रेक्षकांनी माझ्या अभिनयाला दाद देऊन मला हे स्थान मिळवून दिलं, त्यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे, असे आयुष्मान म्हणाला.
बॉलिवूडमध्ये माझ्यासारख्या नवोदित कलाकाराला चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. माझ्यावर विश्वास ठेवून मला दृरदृष्टी असणाऱ्या दिग्दर्शकांनी मला त्यांच्या कथेचा भाग बनवले. माझ्या या यशात त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळे मला चांगले कथानक असलेल्या चित्रपटांचा भाग बनता आले. तसेच माझ्या अभिनयाला वाव मिळाला.
मी साकारत असलेल्या भूमिकांना प्रेक्षक भरभरुन प्रेम देतात. त्यांचेही विशेष आभार मानायला हवेत. माझ्या चित्रपटातून त्यांचे पुरेपुर मनोरंजन व्हावे, हाच माझा उद्देश असतो. माझे चित्रपट चित्रपटगृहातच पाहण्यासाठी ते उत्सुक असतात, यापेक्षा अधिक कौतुकाची पावती काय असू शकते, असेही तो म्हणाला.
आयुष्मानने २०१२ साली सुजीत सरकार दिग्दर्शित विकी डोनर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत, 'शुभ मंगल सावधान', 'ड्रीमगर्ल', 'अंधाधून', 'बाला', 'बधाई हो', यांसारखे सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
'विकी डोनर' चित्रपटालाही ८ वर्षे पूर्ण झाल्याने तो इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅटच्या माध्यमातून भेटीला येणार आहे.
-
Bade dino baad Instagram pe LIVE aa raha hoon to talk about #8YearsOfVickyDonor with the one and only @ShoojitSircar! See you at 4 PM on my profile.
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) April 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Bade dino baad Instagram pe LIVE aa raha hoon to talk about #8YearsOfVickyDonor with the one and only @ShoojitSircar! See you at 4 PM on my profile.
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) April 20, 2020Bade dino baad Instagram pe LIVE aa raha hoon to talk about #8YearsOfVickyDonor with the one and only @ShoojitSircar! See you at 4 PM on my profile.
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) April 20, 2020