मुंबई - स्टार प्रवाहवर सुरु होतोय छोट्यांचा मोठा सिंगिंग शो ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वच वयोगटातील अनेक टॅलेंटेड कलाकार दडलेले आहेत. त्यातील ‘छोटे उस्ताद’ हुडकून काढणार आहे ‘मी होणार सुपरस्टार’ चं एक नवीन पर्व ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’. या छोट्यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी निवड करण्यात आली आहे सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी यांची मुलगी अवनी. याआधी स्टार प्रवाहच्या साथ दे तू मला या मालिकेत अवनी बालकलाकाराच्या रुपात दिसली होती. अवनीसाठी सूत्रसंचालन हा नवा अनुभव असणार आहे.
![अनिरुध्द जोशीची मुलगी अवनी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-mi-honar-superstar-chhote-ustad-host-avni-joshi-mhc10001_16112021014358_1611f_1637007238_932.jpeg)
सिध्दार्थ चांदेकरसोबत केला प्रोमो शूट
मी होणार सुपरस्टारच्या सुत्रसंचलनासाठी ती खूपच उत्सुक आहे. नुकतंच सिद्धार्थ चांदेकरसोबत तिने या कार्यक्रमाचा प्रोमो शूटही केला. सेटवर ती बऱ्याच गोष्टींचं निरीक्षण करत असते. शूटचा मनमुराद आनंद लुटत असते. त्यामुळे मी होणार सुपरस्टारच्या मंचावर सिद्धार्थ चांदेकर आणि चिमुकल्या अवनीची भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे स्टार प्रवाहवर ४ डिसेंबरपासून रात्री ९ वाजता.
हेही वाचा - 'डिअर फ्युचर हसबंड' या गाण्यावर थिरकली मिथिला पालकर