ETV Bharat / sitara

'आराधना' गोल्डन जुबली: 'असा' चित्रपट ज्याने हिंदी सिनेसृष्टीचा चेहरामोहरा बदलला - आराधना

शक्ती सामंत यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटातून राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांची जोडी एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर दोघांच्या जोडीने १९६९ आणि १९७१ या काळात लगातार १७ हिट चित्रपट दिले.

'आराधना' गोल्डन जुबली: 'असा' चित्रपट ज्याने हिंदी सिनेसृष्टीचा चेहरामोहरा बदलला
author img

By

Published : Sep 27, 2019, 8:06 AM IST

मुंबई - अभिनेता राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांची जोडी असलेला 'आराधना' चित्रपट २७ सप्टेंबर १९६९ साली प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण झालीयेत. या चित्रपटाने त्याकाळी देखील नवा पायंडा घातला होता. भारतातच नाही, तर विदेशातही हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.

शक्ती सामंत यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटातून राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांची जोडी एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर दोघांच्या जोडीने १९६९ आणि १९७१ या काळात लगातार १७ हिट चित्रपट दिले.

'आराधना' गोल्डन जुबली

'आराधना' चित्रपटातील भूमिकेसाठी शर्मिला टागोर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

'आराधना' चित्रपटाची कथा सचिन भौमिक यांनी लिहिली होती. हा चित्रपट १९४६ साली हॉलिवूडच्या प्रदर्शित झालेल्या 'टू ईच हिज आउन' या चित्रपटावर आधारित होती. या रोमॅन्टिक चित्रपटात राजेश खन्ना यांनी दुहेरी भूमिका होती. यामध्ये त्यांनी शर्मिला यांचा प्रियकर आणि मुलगा दोन्ही भूमिका साकारल्या होत्या.

हेही वाचा- राजकुमारला मिळाली शाहरुखच्या गाण्यावर डान्स करण्याची संधी, पाहा धमाल व्हिडिओ

या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. 'रुप तेरा मस्ताना', 'मेरे सपनो की रानी', 'कोरा कागज था ये मन मेरा' आणि 'चंदा है तू मेरा सुरज है तू' या सर्वच गाण्यांनी प्रेक्षकांवर छाप पाडली होती.

'रुप तेरा मस्ताना' हे गाणं तर, विशेष चर्चेत राहिलं. या गाण्याला किशोर कुमार यांनी गायलं होतं. यानंतर त्यांनी राजेश खन्ना यांच्यासाठी तब्बल २४५ गाण्यांसाठी आवाज दिला. विशेष म्हणजे 'रुप तेरा मस्ताना' हे तब्बल ३ मिनिट ३० सेकंदाचं गाणं एकाच शॉटमध्ये पूर्ण करण्यात आलं होतं.
या चित्रपटाची आणखी एक विशेषता म्हणजे, चित्रपटाची कथा त्याकाळी देखील आधुनिक दाखवण्यात आली होती. यामध्ये नायिका लग्नाअगोदरच गरोदर राहते. मात्र, तिचे वडील तिला समाजाची पर्वा न करता आधार देतात. हा विचार त्याकाळी मांडणं म्हणजे एक आव्हान होतं, जे दिग्दर्शकाने उत्कृष्टरित्या पेललं होतं. त्याचंच फळ म्हणजे बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने अनेक विक्रम रचले.

हेही वाचा- रितेश देशमुखने शेअर केला 'बिग बीं'चा ३७ वर्षापूर्वीचा व्हिडिओ

पुढे १९७४ साली हा चित्रपट तेलुगू आणि तमिळ भाषेतही रिमेक करण्यात आला. तमिळमध्ये 'शिवगामिन सेलवन' तर, तेलुगू मध्ये 'कन्नवारी कलालु' या शिर्षकांसह हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासातील एक सुवर्ण पान ठरलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या नेहमी स्मरणात राहील यात शंका नाही.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.