मुंबई - अभिनेत्री अनुष्का शर्माने म्हटलंय की ती नेहमी महिलांना सशक्त झाल्याचे आणि स्वतंत्र महिलांना सिनेमाच्या माध्यमातून पाहायचे होते. तिच्या प्रॉडक्शनचा आगामी चित्रपट 'बुलबुल' त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अनुष्का म्हणाली, ''क्लीन स्लेट फिल्म एक दिवशी आपली स्वतःची शैली बनवेल. आम्ही नेहमी कथेची एक अशी शैली बनवू इच्छितो की, जी महिलांसाठी प्रेरणादायी असेल. सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मजबूत आणि स्वतंत्र महिलांना दाखवायचे होते. या दृष्टीने 'बुलबुल' आमचा एक प्रयत्न आहे.''
ती पुढे म्हणाली, ''फिल्म 'बुलबुल' लोकांना आवडत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. लोकांनी आमच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. आमच्याकडे हरवण्यासारखे दुसरे काहीच नाही, असा विचार करुन आम्ही प्रत्येक प्रोजेक्ट करीत असतो. ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. 'पाताल लोक' आणि 'बुलबुल'ला समिक्षक आणि प्रेक्षकांनी नावाजले आहे.''
बॉलिवूडमध्ये नवीन लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि संगीतकार आपली स्वतंत्र ओळख निर्माण करीत आहेत याचा अनुष्काला अभिमान वाटतो.