ETV Bharat / sitara

अंकुश चौधरी : ‘मी होणार सुपरस्टार’ हा कार्यक्रम नवी ऊर्जा घेऊन येणार आहे! - Ankush Chaudhary as the super judge

‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिअलिटी शोच्या सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे. अंकुश तब्बल १५ वर्षांनी टेलिव्हिजनवर दमदार एण्ट्री घेताना दिसेल.

Ankush Chaudhary
अंकुश चौधरी
author img

By

Published : Jul 31, 2021, 10:36 PM IST

सध्या अनेक वाहिन्या मोठ्या स्टार्सना आपल्या कार्यक्रमांचा हिस्सा करून घेताना दिसताहेत जेणेकरून डिजिटल माध्यमाकडे वळलेला प्रेक्षकवर्ग पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे आकर्षित होईल. मराठी सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकुश चौधरीने ‘ऑल द बेस्ट’ या नाटकातून मनोरंजनसृष्टी प्रवेश केला होता. त्यानंतर छोटा पडदा आणि मग मोठा पडदा गाजवत सुपरस्टारपद मिळविले. आता तो स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिअलिटी शोच्या सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे. अंकुश तब्बल १५ वर्षांनी टेलिव्हिजनवर दमदार एण्ट्री घेताना दिसेल.

संपूर्ण महाराष्ट्रातलं टॅलेण्ट या डान्सच्या मंचावर अवतरणार आहे. त्यामुळे सुपरस्टार होण्याचं कुणाचं स्वप्न पूर्ण होणार याची उत्सुकता नक्कीच असेल. नृत्याचे वेगवेगळे प्रकार तितक्याच हटके पद्धतीने मी होणार सुपस्टारच्या मंचावर सादर होणार आहेत. त्यामुळे स्पर्धा अटीतटीची आहे. या स्पर्धकांमधून सुपरस्टार निवडण्याची जबाबदारी अंकुशच्या खांद्यावर आहे. स्टार प्रवाहवर २१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिअलिटी शोमध्ये अंकुश सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे.

या ग्रॅण्ड रिअलिटी शोविषयी सांगताना अंकुश म्हणाला, ‘डान्स हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. या शोमध्ये जरी मी जज असलो तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळताना अतिशय आनंद होत आहे. मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम नवी ऊर्जा घेऊन येणार आहे. पुन्हा एकदा तीच उर्मी आणि तोच उत्साह या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवायला मिळेल. विशेष म्हणजे मी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहसोबत पहिल्यांदाच जोडला जातोय आणि जजची भूमिकाही पहिल्यांदाच पार पाडतोय. फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी प्रत्यक्ष घेईन. त्यामुळे मी या शोसाठी प्रचंड उत्सुक आहे.’

सुपरस्टार अंकुश चौधरी तब्बल १५ वर्षांनंतर टेलिव्हिजनवर दमदार एण्ट्री घेण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘मी होणार सुपरस्टार’ प्रदर्शित होणार आहे २१ ऑगस्टपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.