हैदराबाद : टीव्हीवरील प्रसिद्ध अशा 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात स्वतःची ओळख निर्माण केलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) डिसेंबरमध्ये लग्न करणार आहे. गेल्या काही वर्षांपासून अंकिता ही विकी जैनसोबत चर्चेत आहे. यापूर्वीच या अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
या अभिनेत्रीच्या प्री-वेडिंगचे (Ankita Lokhande Pre-wedding Shoot) काही सुंदर असे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चिले जात आहेत. यापूर्वी अंकिताने तिचा होणारा नवरा असलेल्या विकी जैन सोबत मराठमोळ्या लूकमधील एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला होता.
अंकिताने लग्नापूर्वी तिच्या इंस्टाग्राम (Ankita Lokhande Instagram) अकाउंटवर जे फोटो शेअर केले आहेत त्यामध्ये तिने मरून रंगााची साडी नेसलेली दिसत आहे. तर विकी जैन हा ब्लॅक आऊटफिटमध्ये आहे.
हे फोटो शेअर करत अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'बस यू हीं.' अंकिता आणि विकीच्या या फोटोंवर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.
एका चाहत्याने लिहिलंय, 'ओ माय गॉड...वेरी..वेरी..वेरी..वेरी..वेरी ब्यूटीफुल.' तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलंय, 'परफेक्ट टुगेदर.'
अन्य एका चाहत्याने लिहिलंय, 'परफेक्ट पिक्चर'. गेल्या शनिवारी नुकतेच लग्न झालेली 'कुंडली भाग्य' (Kundali Bhagya) मालिकेतील स्टार अभिनेत्री' श्रद्धा आर्यने (Actress Shraddha Arya) अंकिता आणि विकीच्या लग्नपत्रिकेची एक झलक शेअर केली होती.
श्रद्धाने एक व्हिडीओ शेअर करत अंकिता आणि विकीच्या लग्नाची निळ्या रंगाची पत्रिका उघडून दाखवली होती.
हा व्हिडीओ शेअर करत श्रद्धाने लिहिले होते की, 'आणि आता माझ्या आवडत्या मित्राची वेळ आहे. अभिनंदन अंकिता - विकी.
या महिन्यातच अंकिता आणि विकी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. हे लग्न मुंबई येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये (Hotel Grand Hyatt Mumbai) होणार आहे.