ETV Bharat / sitara

‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनिरुद्धचा अपघात की घातपात? - anirudhha accident in aai kuthe kay karte

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत लवकरच एक धक्कादायक वळण येणार आहे. तणावात असताना अनिरुद्धच्या कारला अपघात होणार आहे. अरुंधती आणि संपूर्ण कुटुंबाला हादरवून टाकणारा हा प्रसंग आहे. या कठीण प्रसंगात अनिरुद्धच्या मदतीसाठी अरुंधती उभी रहाणार की संजना हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

अनिरुद्धचा अपघात की घातपात?
अनिरुद्धचा अपघात की घातपात?
author img

By

Published : Jan 22, 2021, 1:12 PM IST

मुंबई - स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत लवकरच एक धक्कादायक वळण येणार आहे. एकीकडे अरुंधतीने अनिरुद्धला घटस्फोटाची नोटीस दिली आहे तर दुसरीकडे संजनाचं वागणंही अनिरुद्धला खटकू लागले आहे. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहिर अशीच काहीशी अवस्था अनिरुद्धची झाली आहे. स्वत:च्या चुकीमुळे एकटा पडलेल्या अनिरुद्धच्या मनात बरीच मानसिक उलथापालथ सुरु आहे. याच तणावात असताना अनिरुद्धच्या कारला अपघात होणार आहे. अरुंधती आणि संपूर्ण कुटुंबाला हादरवून टाकणारा हा प्रसंग आहे. या कठीण प्रसंगात अनिरुद्धच्या मदतीसाठी अरुंधती उभी रहाणार की संजना हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

मालिकेतल्या या नव्या वळणाविषयी सांगताना अनिरुद्ध साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी म्हणाले, ‘अनिरुद्ध साकारणं हे पहिल्या दिवसापासून मी आव्हान म्हणूनच स्वीकारलं आहे. १२ वर्षांपूर्वी तो संजनाच्या प्रेमात पडला. पण या सगळ्यात त्याने त्याच्या कुटुंबाला सांभाळलं. अनिरुद्धचं वागणं नितिमत्तेला धरुन नसलं तरी त्याची अशी वेगळी बाजू आहे. आता त्याचं आयुष्य अशा वळणावर येऊन पोहोचले आहे जिथे २५ वर्षांचा संसार एकीकडे आणि संजनावरचं प्रेम एकीकडे अश्या दोन्ही गोष्टींमध्ये तो अडकला आहे. अनिरुद्ध खऱ्या अर्थाने असहाय्य झाला आहे. याच तणावामध्ये त्याचा अपघात होतो. हा प्रसंग शूट करणं देखिल अतिशय आव्हानात्मक होतं. मरणाच्या दारात असताना अनिरुद्धच्या मदतीला कोण येणार हे आई कुठे काय करते मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.’

हेही वाचा - नाशिक महानगरपालिका कार्यालयाला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.