मुंबई - अगोदरपासून आपल्या देशात मुलगी झाली की फारसा आनंद व्यक्त होत नाही. मुलींना नेहमीचं दुय्यम वागणूक मिळत आली आहे. शहर असो वा गाव थोड्याफार फरकाने मुलींना म्हणावे तसे स्वातंत्र्य अजूनही मिळत नाही. स्त्रियांना समान दर्जा देण्याच्या नुसत्याच घोषणा केल्या जातात. आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यापलीकडे त्यांच्या समस्यांकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळेच आपल्याकडे ‘मुलगी झाली हो’ सारखा वाक्प्रचार उदयास आला व आजही प्रचलित आहे. याच विषयाची कास धरून ‘मुलगी झाली हो’ ही मालिका बनवण्यात आली आहे. स्टार प्रवाहावरील या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
आता या मालिकेमध्ये अत्यंत भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. खरंतर दुसरीही मुलगी झाली म्हणून माऊला मुलगी म्हणून तिच्या वडिलांनी कधी स्वीकारले नाही. इतकेच काय तिचे तोंडही पाहिले नाही. गाईगुरांच्या गोठ्यात ती लहानाची मोठी झाली. वंशाला दिवा हवा या हट्टाहासापायी माऊच्या वडिलांनी आणि आजीने तिला घरापासून लांब ठेवले. ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील दाखवण्यात आलेले वळण नव्या बदलाची नांदी आहे. आजही बऱ्याच ठिकाणी मुलीचा जन्म म्हणजे अपराध मानला जातो. या मानसिकतेला विचार करायला भाग पडणारे मालिकेतील हे वळण असेल.
माऊला आता मुलगी म्हणून घरात हक्काचे स्थान मिळणार आहे. माऊच्या या त्यागाची खरी किंमत तिचे वडील आता विलासला कळली आहे. म्हणूनच सन्मानाने या लेकीला तो तिच्या हक्काच्या घरी आणणार आहे. लक्ष्मीच्या पावलांनी माऊचा गृहप्रवेश होणार आहे. ‘मुलगी झाली हो’मध्ये बाप लेकीच्या नात्याची ही सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.
हेही वाचा - कृती सेनॉनला वाटले प्रभास 'लाजाळू' आहे, पण..