मुंबई - अभिनेत्री एमी जॅक्सन बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मागच्या वर्षी २३ सप्टेंबरला तिने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. लग्नाअगोदरच गरोदर राहिलेल्या एमीची बरीच चर्चा झाली होती. मात्र, एमी सध्या तिचे मातृत्व एन्जॉय करत आहे. तिचा मुलगा अँड्रियासचे बरेच फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा मुलगा अगदी तिच्याप्रमाणेच गोड असल्याचे या फोटोमध्ये दिसते.
![Amy Jackson son](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6242782_ami.jpg)
एमी आणि तिच्या मुलाच्या फोटोंवर चाहत्यांच्याही बऱ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळतात. आताही तिने तिच्या इन्स्टास्टोरीमध्ये तिच्या मुलाचा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिने 'मम्मीज बॉय' असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो अनेकांनी तिचा मुलगा खूपच क्यूट असल्याचे म्हटले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -स्मृती इराणीने वाढत्या वजनाला धरले करण जोहरला जबाबदार
एमीचा प्रियकर जॉर्ज हा ग्रिक कुटुंबातील असल्यामुळे त्याच्या घरातील परंपरेनुसार पहिल्या मुलाचे नाव हे आजोबांच्या नावावरुन ठेवण्यात येते. त्यामुळे त्यांच्या मुलाचे नाव अँड्रियास ठेवण्यात आले आहे. यावर्षी एमी आणि जॉर्ज लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच एमीच्या चाहत्यांना तिला चित्रपटात पाहण्याचीही आतुरता आहे. सध्या तरी एमी तिच्या मुलासोबत जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - 'अंग्रेजी मेडियम'मधील 'नाचा नू जी करदा' गाणे रिलीज, 'बेफाम' थिरकली राधिका मदन