मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे आणखी एक गाणे यंदाच्या दिवाळीत येत आहे. यावेळी त्या गायक सोनू निगमसोबत गाताना दिसणार आहेत. टाईम्स म्यूझिक हब या कंपनीच्यावतीने हे गीत सादर केले जाणार आहे. अमृता यांनी आपल्या ट्विटरवर गाण्याचे पोस्टर शेअर करुन ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
-
महालक्ष्मीजी की आरती ,
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 26, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
जो कोई नर गाता,
उर आनंद समाता ,
पाप उतर जाता !
ॐ जय लक्ष्मी माता !
Coming up next ....
#Diwali #Laxmi #Aarti @TimesMusicHub pic.twitter.com/Gjh8Db5I7g
">महालक्ष्मीजी की आरती ,
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 26, 2021
जो कोई नर गाता,
उर आनंद समाता ,
पाप उतर जाता !
ॐ जय लक्ष्मी माता !
Coming up next ....
#Diwali #Laxmi #Aarti @TimesMusicHub pic.twitter.com/Gjh8Db5I7gमहालक्ष्मीजी की आरती ,
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 26, 2021
जो कोई नर गाता,
उर आनंद समाता ,
पाप उतर जाता !
ॐ जय लक्ष्मी माता !
Coming up next ....
#Diwali #Laxmi #Aarti @TimesMusicHub pic.twitter.com/Gjh8Db5I7g
अमृता फडणवीस यांचे गायन त्यांच्या राजकीय विरोधकांना आवडत नाही हे वारंवार दिसून आले आहे. तरीही त्यांना मिळणारे लाखो व्यूव्हज म्यूझिक कंपनीसाठी लाभदायक ठरतात. आता दिवाळीला येणाऱ्या गाण्याची घोषणा त्यांनी केल्यानंतर त्यांना ट्रोल केले जात आहे. सोनू निगमवर कोणासोबत गाण्याची वेळ आली अशा प्रकारे टीकाही केली जात आहे. मात्र अमृता यांना माहिती आहे की आपल्या गाण्यावर टीका करणारे जसे लोक आहेत तसे चाहतेही आहेत.
यंदाच्या दिवाळीत येणाऱ्या गाण्याचे शीर्षक आहे, ओम जय लक्ष्मी माता. सोनू निगम आणि अमृता फडणवीस यांच्या आवाजात हे गाणे ऐकायला मिळणार असून श्रेयस पुराणीक यांची या गाण्याला संगीत दिले आहे.
हेही वाचा - प्रतिभावान कलाकारांना योग्य ब्रेक मिळवून देणार ‘अल्ट्रा मीडिया अँड एन्टरटेन्मेंट’!