ETV Bharat / sitara

अमिताभ बच्चन 'बाबू पट्टी'ला जाणार, गावकऱ्यांचा उत्साह शिगेला

अमिताभ बच्चन यांचे मूळगाव उत्तर प्रदेशात बाबू पट्टी आहे. या गावात कुटुंबासोबत जाण्याचा विचार बच्चन यांनी बोलून दाखवला होता. त्यानंतर या गावातील लोकांच्यामध्ये चैतन्याची लाट तयार झाली असून बच्चन यांच्या स्वागतासाठी गावकरी तयारी करीत आहेत.

Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन
author img

By

Published : Oct 23, 2020, 6:22 PM IST

प्रतापगड (यूपी) - बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा जन्म उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील 'बाबू पट्टी' येथे झाला होता. त्या गावातील लोक महानायकाची आतुरतेने वाट पाहात आहेत. गावात साफ सफाईचे काम सुरू असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.

याचे कारणही तसेच आहे. अलिकडेच कौन बनेगा करोडोपती शोमध्ये अमिताभ यांनी आपल्या कुटुंबासमवेत मूळगावी जाण्याचा विचार करत असल्याचे सांगितले होते.

२० ऑक्टोबरला प्रसारित झालेल्या केबीसीच्या भागामध्ये भिलाई छत्तीसगडची स्पर्धक अंकिता सिंग हॉट सीटवर बसली होती. एका प्रश्नाच्या उत्तरात अंकिताने 'व्हिडीओ-कॉल-ए-फ्रेंड'चा वापर केला. उत्तर प्रदेशात फोन अंकिताच्या काकांना लावण्यात आला. यावेळी काकांनी बच्चन यांना त्यांच्या जन्मगावी 'बाबू पट्टी'ला जाण्याचा आग्रह केला.

यावर बच्चन म्हणाले की, अलिकडेच त्यांनी कुटुंबासोबत बाबू पट्टी येथे जाण्यासाठी विचारविनिमय केला असल्याचे सांगितले. तसेच या गावातील मुलांसाठी शाळा बांधण्याची इच्छा व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.