ETV Bharat / sitara

'कौन बनेगा करोडपती'च्या नवीन सीझनला अमिताभने केली सुरुवात - अमितभ बच्चनचे आगामी चित्रपट

अमिताभ बच्चन यांनी कोन बनेगा करोडपतीच्या नव्या सिझनच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. गेली 21 वर्षे ते या शोचे होस्ट म्हणून काम पाहत आले आहेत. सेटवरचा एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मेगास्टार अमिताभ बच्चन
मेगास्टार अमिताभ बच्चन
author img

By

Published : Aug 11, 2021, 9:17 PM IST

मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी गेली 21 वर्षे लोकप्रियतेच्या शीखरावर असलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या गेम शोच्या नवीन सीझनला सुरुवात केली. शोच्या सुरुवातीच्या आठवणीत या निमित्ताने बिग बी रमलेला दिसला. या शोवर निरंतर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे त्याने आभार मानले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी बुधवारी इन्स्टाग्रामवर शोच्या सेटचा फोटो शेअर केला आहे.

मंगळवारी शोच्या 13 व्या सीझनचे शूटिंग सुरू करणाऱ्या मेगास्टार बच्चनने लिहिले, "2000 पासून त्या खुर्चीकडे नजर धावते...21 वर्षे झाली... या काळात जे लोक सोबत आले, त्या सर्वांचे आभार.''

अमिताभ बच्चन या शोच्या सुरुवातीपासून हा शो होस्ट करत आहेत. 2007 मध्ये या शोचे होस्ट म्हणून शाहरुखने काम पाहिले होते. हा एक अपवाद वगळता अमिताभच या शोचा होस्ट राहिला आहे.

सोनी टीव्हीने मंगळवारी उशिरा जाहीर केले की हा शो २३ ऑगस्टपासून प्रसारित होईल.

अमितभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटामध्ये 'चेहरे', नागराज मंजुळे यांचा 'झुंड' आणि करण जोहरचा 'ब्रह्मास्त्र' आणि अजय देवगण दिग्दर्शन करणार असलेल्या 'मेडे' या चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा - ‘कोहोक’च्या कर्मवीर विशेषमध्ये मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे यांची हजेरी!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.