ETV Bharat / sitara

...अखेर अमेयला मिळाली 'गर्लफ्रेन्ड', पाहा व्हिडिओ - esha keskar

अमेय वाघ या चित्रपटात नचिकेतच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सुरुवातीला त्याला गर्लफ्रेन्ड नसल्यामुळे त्याचे मित्र मैत्रीणी त्याला चिडवताना दिसतात. मात्र, शेवटी त्याच्या आयुष्यात नव्या मैत्रीणीची एन्ट्री होते.

...अखेर अमेयला मिळाली 'गर्लफ्रेन्ड', पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Jul 9, 2019, 5:18 PM IST

मुंबई - आजकाल तरुणाईमध्ये गर्लफ्रेन्ड, बॉयफ्रेन्ड असणे फार सामान्य झाले आहे. त्यातही जर कोणाला गर्लफ्रेन्ड किंवा बॉयफ्रेन्ड नसेल, तर मग त्याची मित्रमैत्रीणींमध्ये गोची होते. अशाच आशयावर अभिनेता अमेय वाघचा 'गर्लफ्रेन्ड' चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून चर्चा आहे. या चित्रपटातून अमेय वाघचा नवा लूकदेखील चर्चेत आला आहे. या चित्रपटासाठी त्याने आपला लूक बदलला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

अमेय वाघ या चित्रपटात नचिकेतच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सुरुवातीला त्याला गर्लफ्रेन्ड नसल्यामुळे त्याचे मित्र मैत्रीणी त्याला चिडवताना दिसतात. मात्र, शेवटी त्याच्या आयुष्यात नव्या मैत्रीणीची एन्ट्री होते. त्याची ही नवी मैत्रीण दुसरी तिसरी कोणी नाही तर अभिनेत्री सई ताम्हणकर आहे. सई या चित्रपटात नचिकेतच्या गर्लफ्रेन्डच्या रुपात दिसणार आहे.
दोघेही या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. अमेय आणि सई शिवाय या चित्रपटात 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील जूनी आणि नवी अशा दोन्ही शनाया दिसणार आहेत. म्हणजे, रसिका सुनील आणि ईशा केसकर दोघींचीही या चित्रपटात भूमिका आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'गर्लफ्रेन्ड' चित्रपटाचे दिग्दर्शन उपेंद्र सिंधये हे करत आहेत. त्यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर, निर्मिती अनिश जोग, रणजित गुगळे, अमेय पाटील, कौस्तुभ धामणे, अफीफा सुलेमान नाडियादवाला हे करत आहे. २६ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आता अमेयला त्याची गर्लफ्रेन्ड नक्की कशी भेटते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.